पंजाबमधील २३वा जिल्हा मलेरकोटला
- सातशे वर्षाचे शहर पंजाबमधील मलेरकोटलाला २३ वा जिल्हा म्हणून मान्यता देण्यात आली.
- हा जिल्हा प्रामुख्याने मुस्लिमबहुल आहे. ६०% जनता मुस्लिम
- मलेरकोटला राज्याची निर्मिती सूफी शेख सदरुद्दीन सदर ए जहाँ यांनी १४५४ मध्ये केली होती.
- सदरुद्दीन शेख हे हैदर शेख या नावाने प्रसिद्ध होते. ते अफगाण प्रांतात राहणारे शेरवानी अफगाण होते.
- लेपल हेन्री ग्रिफिन यांचे ‘राजाज ऑफ द पंजाब’, या पुस्तकानुसार ‘मालेर’ या शब्दाचा संबंध राजपूत राजा मलेरसिंगशी जोडला आहे.
- मध्ययुगीन काळापासून भारतीय-इराणी वास्तुकलेचे नमुने येथे आहेत.