पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी
- चरणजितसिंग चन्नी यांनी पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
- पंजाब राज्याचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी चरणजितसिंग चन्नी यांना शपथ दिली. तसेच सुखबिंदरसिंग रंधवा आणि ओ. पी. सेना या दोन उपमुख्यमंत्र्यांनाही शपथ दिली.
- चन्नी हे पंजाब राज्याचे पहिले दलित शीख मुख्यमंत्री ठरले आहेत.
- चन्नी यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत विविध घोषणा केल्या व तीन नवीन कृषी कायदे मागे घेण्याची मागणीही त्यांनी केली.
- पंजाबमध्ये पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री बनवण्यात आले असून जाट-हिंदू समाजाला प्रतिनिधित्व देऊन जातीचे संतुलनही साधण्यात आले आहे.
- राज्यात अकाली दल आणि भाजपाची सत्ता असताना चरणजितसिंग चन्नी विधानसभेत विरोधी पक्षनेते होते.
- ते चमकौर साहिब मतदारसंघाचे आमदार असून त्यांनी मंत्री म्हणून तांत्रिक शिक्षण आणि औद्योगिक प्रशिक्षण, रोजगार निर्मिती आणि प्रशिक्षण, पर्यटन आणि संस्कृती व्यवहार विभागाची जबाबदारी सांभाळली होती.