न्यूझीलंडच्या पंतप्रधानपदी ‘जॅकिंडा आर्डर्न’ यांची परत निवड

न्यूझीलंडच्या पंतप्रधानपदी ‘जॅकिंडा आर्डर्न’ यांची परत निवड – 

 • 2020 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मजूर पक्षाच्या नेत्या जॅकिंडा आर्डर्न यांचा परत विजय झाला आहे.
 • निवडणुकीमध्ये मजूर पक्षाने 49% मतांनी संसदेतील 64 जागांवर विजय मिळवला आहे.
 • ज्यामुळे एकहाती विजय मिळवलेला हा पहिलाच पक्ष ठरतो. त्यांच्या सहयुतीतील पक्ष ‘ग्रीन पार्टीने 8% मतांनी म्हणजेच 10 जागांवर विजय मिळवला.
 • नॅशनल पार्टी 29% मतांनी संसदेतील 35 जागांवर विजय मिळवून विरोधी पक्ष बनला आहे.
 • न्यूझीलंडच्या निवडणुकीत गेल्या 24 वर्षांमध्ये कोणत्याही एका पक्षाने एकहाती विजय मिळवला नाही. ही पहिलीच वेळ आहे.

जॅकिंडा आर्डर्न

 • सर्वप्रथम पंतप्रधान म्हणून वयाच्या 37 व्या वर्षी 2017 मध्ये निवडून आल्या.
 • त्या जगातील 3ऱ्या महिला नेत्या व सर्वात तरुण नेत्यांपैकी एक आहेत.
 • बेनझीर भुत्तो नंतर पदभार सांभाळताना जन्म देणाऱ्या त्या दुसऱ्या जागतिक नेत्या आहेत.
 • Christchurch mosque shooting, नंतर हत्यारे बाळगण्याचा कायदा आणखी कठोर केला. COVID-19 च्या काळामध्ये त्यांनी देशाला उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले.

Contact Us

  Enquire Now