
नो मॅडलँड, बोराटरला गोल्डन ग्लोब पुरस्कार
- क्लो झाओ यांचा नो मॅडलँड, सॅशा बॅरॉन कोहेन यांचा ‘बोराट सब्सिक्वेंट मुव्ही फिल्म’ (विनोदी गटात) या चित्रपटांनी गोल्डन ग्लोब पुरस्कारात बाजी मारली आहे.
- नोमॅडलँड हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला.
- कोरोना साथीमुळे आभासी पातळीवर हा पुरस्कार कार्यक्रम झाला.
- झाओ या चिनी अमेरिकी निर्मात्या असून त्यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचाही पुरस्कार मिळाला आहे.
- गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळविणाऱ्या त्या आशियायी वंशाच्या पहिल्या महिला दिग्दर्शक आहेत.
- नो मॅडलँड या चित्रपटाला युरोपीय महोत्सवातही गोल्डन लायन पुरस्कार मिळाला होता.
- रोसामंड पाइक यांना ‘आय केअर नॉट’ चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला.
- ब्लॅक पँथरमधील चॅजविक बोसवन यांना मरणोत्तर गौरवण्यात आले असून त्यांनी ट्रम्पेट वादक लेव्ही यांची भूमिका ‘मा रेनीज ब्लॅक बॉटम’ या चित्रपटात साकारली होती.
- ‘The Writed states vs Holiday’ या चित्रपटासाठी अँड्रा डे यांनी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे.
- प्रथमच कृष्णवर्णीयांचा गौरव या पुरस्काराने करण्यात आला.
- हॉलिवूड फॉरेन प्रेस असोसिएशन या संघटनेत ९०% आंतरराष्ट्रीय कृष्णवर्णीयेतर पत्रकार असून दरवर्षी हे पुरस्कार त्या संघटनेकडून दिले जातात.
गोल्डन ग्लोब पुरस्काराबद्दल
- हा जगातील एक प्रमुख सिने पुरस्कार आहे.
- ९३ सदस्य असलेल्या हॉलिवूड फॉरेन प्रेस असोसिएशन ह्या संस्थेद्वारे दरवर्षी अमेरिकन व आंतरराष्ट्रीय चित्रपट तसेच दूरचित्रवाणी मालिकांना हा पुरस्कार दिला जातो.
- सुरुवात – जानेवारी १९४४
- ठिकाण – लॉस एंजेल्स, अमेरिका