नोबेल पुरस्कार विजेते भौतिकशास्रात स्टिव्हन वेनबर्ग यांचे निधन
- सैद्धांतिक भौतिकशास्त्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे अमेरिकेचे नोबेल पुरस्कार विजेते स्टिव्हन वेनबर्ग यांचे २३ जुलै २०२१ ला अमेरिकेच्या टेक्सास शहरात निधन झाले.
- ते ८८ वर्षांचे होते. (जन्म – ३ मे १९३३, न्यूयॉर्क)
कार्य
- उच्च ऊर्जापातळीवर विद्युत चुंबकीय व इतर कमकुवत बले ही एकसारखी असतात. हा सिद्धांत त्यांनी मांडला.
- मूलभूत कणांचे विद्युत भार आणि वस्तुमान याचे त्यांनी वर्गीकरण केले. त्यातून पुढे प्रमाणित सिद्धांताचा पाया घातला गेला. त्यासाठी वेनबर्ग, पाकिस्तानी अणुशास्त्रज्ञ डॉ. अब्दुस सलाम आणि शेल्डन ग्लॅशहाऊ यांना १९७९ भौतिकशास्त्राचा पुरस्कार मिळाला.