नेपाळचे पंतप्रधान ओली यांची पक्षातून हकालपट्टी
- नेपाळचे पंतप्रधान खडकप्रसाद शर्मा ओली यांची ‘नेपाळ कम्युनिस्ट पक्ष’ या सत्ताधारी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
- ओली यांनी संसदेचे विसर्जन केले आहे. त्यामुळे नेपाळमध्ये राजकीय अनागोंदी माजली आहे. हा घटनाबाह्य निर्णय घेतल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.
- नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीने हा निर्णय घेतला. पुष्पकुमार दहल प्रचंड आणि माधवकुमार नेपाल या दोन माजी पंतप्रधानांच्या गटाने ही बैठक बोलावली होती. पक्षाने त्यांना ‘हकालपट्टी का करू नये’ अशी नोटीस पाठवली होती, मात्र त्यांनी कोणताही खुलासा केला नाही.
- संसद विसर्जित करून एप्रिल – मे महिन्यात नव्याने निवडणुका घेण्याचा निर्णय ओली यांनी २० डिसेंबर रोजी जाहीर केला. त्यास नेपाळच्या अध्यक्षा विद्यादेवी भंडारी यांनी मंजुरी दिली आहे.
- ओली हे दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. २०१५मध्ये नेपाळने नवीन राज्यघटनेचा स्वीकार केल्यानंतर ते पहिले पंतप्रधान होते. २०१८मध्ये ते दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. तसेच ते नेपाळच्या कम्युनिस्ट पक्षाचे अध्यक्षही होते.