नीरा नृसिंहपूर विकासासाठी २८.४८ कोटी रुपयांचा निधी

नीरा नृसिंहपूर विकासासाठी २८.४८ कोटी रुपयांचा निधी

  • इंदापूर तालुक्यातील श्री. क्षेत्र नीरा नृसिंहपूर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी पर्यटन विभागामार्फत २८.४८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
  • राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या पर्यटनदृष्ट्या विकासासाठी शासनाने पुढाकार घेतला असून, याअंतर्गत श्रीक्षेत्र नीरा नृसिंहपूरसाठी मंजूर निधींमधून चांगल्या दर्जाच्या सोयी सुविधांची उभारणी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
  • ठाकरे म्हणाले, श्री क्षेत्र नीरा नृसिंहपूरच्या विकासासाठी २६०.८३ कोटी रुपयांचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर केला आहे. याअंतर्गत तरतुदींनुसार आतापर्यंत निधी वितरित केला असून आता २८.४८ कोटी रुपयांच्या निधी वितरणास मान्यता दिली आहे.
  • भीमा आणि नीरा नदीच्या संगमावर वसलेल्या या तीर्थक्षेत्राचे पर्यटनदृष्ट्याही महत्त्व आहे. भाविक आणि पर्यटकांना चांगल्या दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देऊन, पर्यटनस्थळांच्या नकाशावर ठळकपणे आणण्यात येईल असेही ठाकरे म्हणाले.

Contact Us

    Enquire Now