नीरज चोप्राच्या सन्मानार्थ ७ ऑगस्ट राष्ट्रीय भालाफेक दिन

नीरज चोप्राच्या सन्मानार्थ ७ ऑगस्ट राष्ट्रीय भालाफेक दिन

 • देशाला भालाफेकीमध्ये पहिलेवहिले सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या नीरज चोप्राच्या सन्मानार्थ ७ ऑगस्ट हा दिवस यापुढे राष्ट्रीय भालाफेक दिन म्हणून साजरा करण्यात येईल.
 • याच दिवशी नीरजने देशासाठी ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले होते.
 • ७ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय भालाफेक दिन म्हणून साजरा केला जाईल आणि या दिवशी सर्व राज्यांमध्ये भालाफेकीच्या स्पर्धा होतील.

नीरज चोप्रा.

 • ओळख : भालाफेकपटू, गोल्डन बॉय
 • जन्म : २४ डिसेंबर, १९९७
 • ठिकाण : खंड्रा, पानिपत हरियाणा
 • विशेष : अंडर-२० जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेत जिंकणारा (Track and field) पहिला भारतीय ॲथलेट खेळाडू

चर्चेत

 • टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवल्यामुळे
 • या स्पर्धेत नीरजने पहिल्या प्रयत्नात ८७.०३ मीटर्स अंतरावर भाला फेकला, तर दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटर अंतर गाठले.
 • हे अंतर सहाही प्रयत्नांत कोणत्याही भालाफेकपटूला पार करता आले नाही.
 • ऑलिम्पिकमधील ॲथलेटिक्समध्ये सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला.
 • भारताच्या ऑलिम्पिक इतिहासात सुवर्णपदक मिळवणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला.
 • पहिला खेळाडू – अभिनव बिंद्रा (नेमबाज) – बीजिंग ऑलिम्पिक २००८
 • तेरा वर्षांनंतर, भारताचे हे ऑलिम्पिकमधील दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक ठरले.
 • २०१६ – नीरज भारतीय सैन्यात Junior Commissioned officer म्हणून रुजू झाला.
 • २०१८ – अर्जुन पुरस्कार
 • २०२० – भारतीय सैन्यातील विशिष्ट सेवा पदक देऊन सन्मानित
 • २०१८ – आशियान स्पर्धा, जकार्ता – सुवर्णपदक
 • २०१८ – राष्ट्रकूल स्पर्धा, गोल्ड कोष्ट – सुवर्णपदक
 • २०१७ – एशियान चॅम्पियनशिप स्पर्धा, भुवनेश्वर – सुवर्णपदक
 • २०१६ – दक्षिण आशियाई स्पर्धा, गुवाहाटी, सुवर्णपदक

Contact Us

  Enquire Now