नीती आयोगामार्फत राज्य पोषण अहवाल जाहीर
- नीती आयोगाने १ ऑक्टोबर २०२१ रोजी राज्य पोषण अहवाल (State Nutrition Profile) जाहीर केला. यामध्ये एकूण १९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे.
- यामध्ये नीती आयोगाला UNICEF, IFRI (International Food Policy Research Institute) आणि IEG (Institute of Economic Growth) यांचे साहाय्य लाभले.
- या अहवालावरून खुरटे कुपोषण (Stunting) शुष्क कुपोषण (wasting) तसेच रक्तक्षय (Anaemia) याबाबत एकत्रित माहिती मिळते.
- या अहवालासाठी ‘राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण’च्या ३, ४ आणि ५ व्या टप्प्याच्या माहितीचा वापर करण्यात आला.
- पोषण २.० (POSHAN = PM’S Overarching Scheme for holistic Nourishment Abhiyan २.०)
- सुरुवात – ८ मार्च २०१८ – झुनझुनू, राजस्थान
- उद्देश – बालक, गरोदर व स्तनदा मातांच्या पोषणात वाढ करणे, जीवनसत्त्व अ आणि लोह कमतरता दूर करणे.