निसर्ग आणि मानवासाठी महत्वाकांक्षी युती
- फ्रेंच आणि भारतीय सरकार यांच्यात झालेल्या एका समारंभात, भारत अधिकृतपणे निसर्ग आणि मानवासाठीच्या उच्च महत्वाकांक्षी युतीमध्ये (High Ambition Coalition for Nature and People-HAC) सामील झाला.
- ब्रिक्स देशांमधील सामील होणारा भारत हा पहिलाच देश आहे.
- चीनने आयोजित केलेल्या आगामी उच्च स्तरीय जैवविविधता बैठकीच्या पार्श्वभूमीवर भारताने ही घोषणा केली आहे.
निसर्ग आणि मानवासाठीची उच्च महत्वाकांक्षी युती :
- जानेवारी २०२१ मध्ये पॅरिसमध्ये झालेल्या “वन प्लॅनेट समिट” मध्ये सदर युतीची सुरुवात झाली.
- कोस्टारिका आणि फ्रान्स हे सह-अध्यक्ष असून ब्रिटन हा महासागरिय सह-अध्यक्ष आहे.
- ३० × ३० हे लक्ष्य साध्य करण्यासाठी एकत्र आलेल्या ७० पेक्षा जास्त देशांची ही युती आहे.
३० × ३० लक्ष्य :
- २०३० पर्यंत जगातील कमीत कमी ३० टक्के जमीन आणि महासागरांना संरक्षित करणे.
- ३० × ३० लक्ष्य हे प्रजातींचे झपाट्याने होणारे नुकसान थांबवणे आणि आर्थिक सुरक्षिततेचे स्रोत असलेल्या महत्वाच्या परिसंस्थांचे संरक्षण करणारे एक जागतिक लक्ष्य आहे.
- सध्या जगातील केवळ १५ टक्के जमीन आणि ७ टक्के महासागरे संरक्षित आहेत.