निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांचा राजीनामा
- भारताचे निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी आपल्या पदाचा १८ ऑगस्ट २०२० रोजी राजीनामा दिला आहे.
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हा राजीनामा स्वीकारला असून त्यांच्या जागी राजीव कुमार (१ सप्टेंबर २०२०) यांची नेमणूक करण्यात आली आहे.
- अशोक लवासा हे आशियाई विकास बँकेत उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.
- आशियाई विकास बँकेत ते दिवाकर गुप्ता यांची जागा घेतील.
भारतीय निवडणूक आयोग :
- भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३२४ नुसार भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती २५ जानेवारी १९५० रोजी करण्यात आली.
- यामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती वेळोवेळी ठरवतील इतके इतर निवडणूक आयुक्त असतील.
- त्यांचा कार्यकाळ ६ वर्षे किंवा वयाची ६५ वर्षे पूर्ण होईपर्यंत यांपैकी जे अगोदर पूर्ण होईल तोपर्यंत असतो.
- नेमणूक राष्ट्रपतीद्वारे केली जाते.
- कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी ते कधीही राजीनामा राष्ट्रपतींना देऊ शकतात व त्यांना राष्ट्रपतीद्वारे काढले जाऊ शकते.
सध्याची रचना :
- मुख्य निवडणूक आयुक्त : सुनील अरोरा
- इतर निवडणूक आयुक्त (२) : १) सुशीलचंद्र २) राजीव कुमार
काही महत्त्वाचे –
- पहिले मुख्य निवडणूक आयुक्त – सुकुमार सेन
(२१ मार्च १९५० ते १९ डिसेंबर १९५८)
- दहावे मुख्य निवडणूक आयुक्त – टी. एन. शेषन
(१२ डिसेंबर १९९० ते ११ डिसेंबर १९९६)
- सध्याचे (२३ वे) मुख्य निवडणूक आयुक्त – सुनील अरोरा
(२ डिसेंबर २०१८ पासून)
-
- १ ऑक्टोबर १९९३ पासून निवडणूक आयोग त्रिसदस्यीय झाला. (तत्कालीन रचना – टी. एन. शेषन (मुख्य निवडणूक आयुक्त) एस. एस. गिल आणि डी. कृष्णमृर्ती (अतिरिक्त आयुक्त)
- SVEEP कार्यक्रम – Systematic Voter’s Education and Electoral Participation.
- उद्दिष्टे – लोकांना मतदानाचे महत्त्व सांगून शिक्षित करणे.
- मतदानातून निवडणुकांमध्ये सहभाग वाढविणे.
- राष्ट्रीय मतदार दिवस – २५ जानेवारी (२०११ पासून साजरा केला जातो.)
- आशियाई विकास बँक (ADB)
- मुख्यालय – मनिला (फिलीपीन्स)
- स्थापना – १९ डिसेंबर १९६६
- सदस्य – ६८
- अध्यक्ष – मासात्सुगु असाकावा – (परंपरेने ADB चा अध्यक्ष नेहमी जपानचा असतो.)
- उपाध्यक्ष – अशोक लवासा
- उद्देश – आशियाई देशांचा विकास घडवणे.