निती आयोगाचा पहिला ‘राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक’

निती आयोगाचा पहिला ‘राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक’

 • निती आयोगाने २६ नोव्हेंबर २०२१ रोजी आपला पहिला राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक – २०२१ प्रकाशित केला. (National Multidimensional Poverty Index २०२१)
 • हा निर्देशांक राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-४ २०१५-१६ (NFHS-4) वर आधारित आहे.
 • आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान या ३ आयाम तर पुढील १२ निर्देशकांद्वारे हा निर्देशांक काढण्यात आला आहे. पोषण, बाल आणि पौगंडावस्थेतील मृत्यू, प्रसूतीपूर्व काळजी, शालेय शिक्षणाची वर्षे, शाळेतील उपस्थिती, स्वयंपाक इंधन, स्वच्छता, पिण्याचे पाणी, वीज, घरे, मालमत्ता व बँक खाते इ.
 • सहाय्य – १२ संबंधित मंत्रालये
 • राज्यसरकारे
 • ऑक्सफर्ड विद्यापीठाचा OPHI उपक्रम
 • UNDP

या निर्देशांकातील ठळक बाबी

 • भारतात बिहारमध्ये सर्वाधिक (५१.९१%) गरीब आहे.
 • महाराष्ट्रात १४.८५% लोक गरीब आहेत.
 • सर्वाधिक गरीब लोकसंख्या असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा सतरावा क्रमांक लागतो.

सर्वाधिक गरीब लोकसंख्या प्रमाण असणारी राज्ये/केंद्रशासित प्रदेश

१) बिहार (५१.९१)

२) झारखंड (४२.१६%)

३) उत्तरप्रदेश (३७.७९)

४) मध्यप्रदेश (३६.६५%)

५) मेघालय (३२.६७%)

सर्वात कमी गरीब लोकसंख्या प्रमाण असणारी राज्ये/केंद्रशासित प्रदेश

१) केरळ (०.७१%)

२) पुदूच्चेरी (१.७२%)

३) लक्षद्वीप (१.८२%)

४) गोवा (३.७६%)

५) सिक्कीम (३.८२%)

Contact Us

  Enquire Now