‘नासा’च्या मुख्यालयाला मेरी जॅक्सन यांचे नाव
- अमेरिकेच्या नॅशनल एअरोनॉटिक्स अॅण्ड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (नासा)च्या वॉशिंग्टन डी. सी. येथील मुख्यालयाला नासाची पहिली ‘ब्लॅक’ इंजिनिअर मेरी जॅक्सनचे नाव देण्यात आले आहे.
- मेरी जॅक्सन यांच्यामुळे अवकाश क्षेत्रात ब्लॅक्सना संधीची दारे उघडी झाली. ‘नासा’मध्ये काम करण्यापूर्वी मेरी जॅक्सन यांनी अमेरिकन आर्मी सचिव म्हणून काम केले होते.
- मेरी या गणितज्ञ होत्या. १९५१ मध्ये प्रथम त्यांची नियुक्ती नॅशनल अॅडव्हायजरी कमिटी फॉर एरोनॉटिक्समध्ये करण्यात आली. याच संस्थेचे रूपांतर १९५८ मध्ये ‘नासा’मध्ये करण्यात आले.
- मेरी जॅक्सन, डोरोथी वौगन आणि कॅथरिन जॉन्सन यांच्या आयुष्यावर आधारित ‘हिडन फिगर्स’ हा चित्रपट निर्माण करण्यात आला होता.