नासाचे लूसी अभियान
- नासाने ‘लुसी’ मिशन सुरू करण्याची घोषणा केली आहे. पुढच्या आठवड्यात ते प्रक्षेपित केले जाईल.
- पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्राचा वापर करुन अंतराळयानाला लघुग्रहापर्यंत पोहोचण्यासाठीच्या प्रवासात मदत करण्यासाठी हे यान पृथ्वीवरुन दोनदा प्रक्षेपित होणार आहे.
- लुसी’ मिशन बद्दल:
- गुरु ग्रहाच्या ट्रोजन लघुग्रहांचा अभ्यास करण्यासाठीचे नासाचे हे पहिले अभियान आहे.
- हे सौर ऊर्जेवर चालणारे अभियान असून 12 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी कार्यरत राहण्याचा अंदाज आहे
- ज्या दरम्यान आपल्या सूर्यमालेचा चांगल्या रितीने अभ्यास करण्यासाठी हे यान सुमारे 6.3 अब्ज किमीचे अंतर कापुन गुरूच्या आठ लघुग्रहांचे परिक्षण करेल.
- मिशनचे ध्येय:
- ट्रोजन लघुग्रहांचा भाग असलेल्या विविध लघुग्रहांची रचना समजून घेण्यासाठी,
- ट्रोजन लघुग्रहांभोवती प्रदक्षिणा घालणारे उपग्रह आणि कडा यांचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यांच्या पदार्थांचे वस्तुमान व घनता निश्चित करण्यासाठी हे अभियान तयार केले गेले आहे.
- ट्रोजन लघुग्रह काय आहेत?
- असे मानले जाते की हे लघुग्रह सुरुवातीच्या सूर्यमालेचे अवशेष आहेत आणि त्यांचा अभ्यास केल्याने शास्त्रज्ञांना सूर्यमालेची उत्पत्ती आणि उत्क्रांती समजण्यास मदत होईल .
- असे मानले जाते की ट्रोजन लघुग्रह त्याच पदार्थापासून तयार झाले आहेत ज्या पदार्थापासून ग्रहांची निर्मिती सुमारे 4 अब्ज वर्षांपूर्वी सुर्यमाला तयार होताना झाली होती.