नाविक – भारताची स्वदेशी दिशादर्शन प्रणाली

नाविक – भारताची स्वदेशी दिशादर्शन प्रणाली

 • उपराष्ट्रपती वैंकैय्या नायडू यांनी इस्रोने भारतीय प्रादेशिक दिशादर्शन उपग्रह प्रणाली [IRNSS-नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टेलेशन (नाविक)] जागतिक वापरासाठी उपलब्ध करून देण्याची सूचना केली आहे.
 • भारतीय प्रादेशिक दिशादर्शन उपग्रह प्रणाली उपक्रम केंद्र शासनाद्वारे २००६ मध्ये सुरू करण्यात आला होता.
 • भारताची स्वतःची दिशादर्शन प्रणाली असावी यासाठी १ जुलै २०१३ ला IRNSS-१A हा  दिशादर्शक उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला.
 • त्यानंतर असे एकूण सात उपग्रह प्रक्षेपित करण्यात येऊन भारताची स्वतःची प्रादेशिक दिशादर्शन प्रणाली विकसित केली गेली.
 • २८ एप्रिल २०१६ रोजी  IRNSS-१G प्रक्षेपित करण्यात आला.
 • IRNSS-१G च्या प्रक्षेपणासह, भारताच्या पंतप्रधानांनी IRNSS चे नाव बदलून नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टेलेशन (नाविक) केले.
 • सध्या, IRNSS प्रणालीमध्ये आठ उपग्रह असून, भूस्थिर कक्षेतील तीन उपग्रह आणि भू-समकालिक कक्षेतील पाच उपग्रह आहेत.
 • IRNSS-१A मध्ये बिघाड झाल्यामुळे IRNSS-१I हा IRNSS-१A ची जागा घेणार आहे.
 • या प्रणालीचा मुख्य उद्देश भारत आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशात विश्वसनीय स्थिती, दिशादर्शन आणि वेळ सेवा प्रदान करणे हा आहे.
 • नाविक हे प्रस्थापित आणि लोकप्रिय अशा  यूएस ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (जीपीएस) प्रमाणेच पण केवळ भारतीय उपखंडात १,५००-किमी त्रिज्येमध्ये कार्य करते.
 • तसेच त्याची अचूकता २० मीटर्स पर्यंत आहे.

संभाव्य उपयोग:

 •  स्थलीय, हवाई आणि सागरी दिशादर्शन
 •  आपत्ती व्यवस्थापन
 •  वाहन ट्रॅकिंग आणि फ्लीट व्यवस्थापन (विशेषतः खाण ​​आणि वाहतूक क्षेत्रासाठी)
 •  मोबाइल फोनसह एकत्रीकरण
 •  अचूक वेळ (एटीएम आणि पॉवर ग्रिड्ससाठी)
 •  मॅपिंग आणि जिओडेटिक डेटा कॅप्चर
 • अमेरिकेचा जीपीएस, रशियाचा ग्लोनास, युरोपचा गॅलिलिओ आणि चीनचा beidou यांसारखी स्वतःची नेव्हिगेशन प्रणाली असलेल्या ५ देशांपैकी भारत एक बनला आहे. त्यामुळे दिशादर्शनासाठी भारताचे इतर देशांवरील अवलंबित्व कमी झाले आहे.

Contact Us

  Enquire Now