नारीशक्तीने रचला सर्वाधिक अंतर पार करण्याचा इतिहास

 नारीशक्तीने रचला सर्वाधिक अंतर पार करण्याचा इतिहास

 • भारताच्या चार महिला वैमानिकांच्या चमूने सर्वात लांबच्या हवाई मार्गावरून व उत्तर ध्रुवावरून प्रथमच उड्डाण करून इतिहास निर्माण केला.
 • एअर इंडियाच्या AI-176 या बोईंग विमानाने त्यांनी उड्डाण केले.
 • अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को विमानतळावरून उड्डाण करून उत्तर ध्रुव व अटलांटिक समुद्रमार्गे त्यांनी हा प्रवास केला.
 • 16 हजार किलोमीटर अंतर एकाच टप्प्यात पार करीत हे विमान बंगळूरूमधील केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहाटे 3.45 वाजता पोहोचले.
 • वैमानिकांचा चमूमध्ये कॅप्टन झोया अग्रवाल, कॅप्टन पापागरी थनमई, कॅप्टन शिवाजी मन्हास आणि कॅप्टन आकांक्षा सोनवणे या चार जणींचा समावेश होता.
 • कॅप्टन झोया यांच्याकडे या चमूचे नेतृत्व होते.
 • अमेरिकेच्या पश्चिम किनारी भाग आणि भारताचा दक्षिण भाग यादरम्यान पहिल्यांदाच थेट विमानभरारी या प्रवासात घेण्यात आली आहे.
 • एअर इंडियाच्या वैमानिकांनी यापूर्वीही ध्रुवीय मार्गावरून उड्डाण केले आहे.
 • उत्तर ध्रुवावरून विमान उडवणे अतिशय आव्हानात्मक असल्याने ही जबाबदारी अनुभवी पुरुष वैमानिकांकडेच देत असत.
 • परंतु केवळ महिला वैमानिकांद्वारे उत्तर ध्रुवावरून यशस्वी उड्डाण करून त्यांनी जागतिक इतिहास रचला आहे.
 • 30000 फूट उंचीवरून हा प्रवास करण्यासाठी त्यांना 17 तासांचा वेळ लागला तसेच 10 टन इंधनाची बचत झाली.
 • बेंगळूरू येथे विमान उतरल्यानंतर केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ’Way to go girls!!’ असे ट्विट करून त्यांचे अभिनंदन केले.

चमुबद्दल-

 • अ) कॅप्टन झोया अग्रवाल या बोईंग-777 हे विमान चालवणाऱ्या जगभरातील सर्वात तरुण महिला वैमानिक आहेत. त्या दहा वर्षांपासून वैमानिक म्हणून कार्यरत आहेत.
 • ब) मुंबईकर कॅप्टन आकांक्षा सोनवणे यांनी अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये विमान उड्डाणाचे धडे गिरवले. त्यांची मोठी बहीण तेजल याही एअर इंडियामध्ये कॅप्टन आहेत.

Contact Us

  Enquire Now