नामवंत भारतीयांची परदेशातील गुंतवणूक पॅँडोरा पेपर्सद्वारे उघडकीस
- पॅँडोरा पेपर्समुळे जगातील शक्तिशाली राजकारणी, अब्जाधीश, वलयांकित व्यक्ती, धार्मिक नेते व अमली पदार्थ विक्रेते यांचे मोठे प्रासाद, किनाऱ्यावरील आलिशान घरे व इतर संपत्तीतील गुंतवणूक उघड झाली आहे.
- जगातील १४ आस्थापनाकडून १.२ कोटी कागदपत्रे हाती आली आहेत.
- इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्ट या संस्थेने अनेकांची संपत्ती उघड केली आहे.
- पॅँडोरा पेपर्स लीकमध्ये अनेक प्रमुख भारतीय नावे समाविष्ट करण्यात आली आहेत.
- त्यात माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, उद्योगपती अनिल अंबानी, गांधी कुटुंबियांचे निष्ठावान दिवंगत नेते सतीश शर्मा आदींचा समावेश आहे.
- करसवलत किंवा संपूर्ण करमाफी असलेल्या देशांत गुप्त गुंतवणूक केली आहे.
- सन २०१६ साली अवसायनात गेलेल्या ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्समधील एका परदेशी कंपनीचे लाभार्थी मालक म्हणून सचिन तेंडुलकर आणि त्यांच्या कुटुंबियांचा समावेश आहे.
- अंजली तेंडुलकर आणि आनंद मेहता यांची ‘बीव्हीआय’ मधील सास इंटरनॅशनल लि. या कंपनीचे बीओ व संचालक म्हणून नावे आहेत.
- पॅँडोरा रेकॉर्डसमध्ये सासचा पहिला उल्लेख २००७ मध्ये आला आहे.
- जगभरातील कुठल्याही कंपनीत आपली मालमत्ता नाही, असे रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक अनिल अंबानी यांनी फेब्रुवारी २०२० मध्ये सांगितले होते.
- पण त्यांच्या मालकीच्या किमान १८ परदेशी कंपन्या आहेत.
- काँग्रेसचे निधन पावलेले नेते सतिश शर्मा यांचे परदेशात मालमत्ता आणि कंपन्या होत्या हे पॅडोरा पेपरमधून दिसून आले आहे. पण निवडणुकीत अर्ज भरताना शर्मा यांनी निवडणूक आयोगाकडे या ट्रस्टची माहिती दिली नाही.
पॅँडोरा पेपर म्हणजे काय?
- पँडोरा पेपर्स हे प्रत्यक्षात १२ दशलक्ष दस्तऐवज लीक झालेल्या पेपर्सचे नाव आहे.
- याद्वारे जगातील अनेक श्रीमंत आणि शक्तिशाली लोकांची छुपी संपत्ती समोर येते.
- काही प्रकरणांमध्ये मनी लॉडरिंगची नोंदही झाली आहे.
- ११७ देशांतील ६०० हून अधिक पत्रकारांनी १४ स्रोतांकडून कागदपत्रे शोधली आहेत.
- इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्टने हा डेटा प्राप्त केला.
पँडोरा पेपरमध्ये उघड
- ९० देशातील ३०० हून अधिक नेत्यांची नावे समाविष्ट आहेत.
- ज्यांनी आपली मालमत्ता लपवण्यासाठी अनेक गुप्त कंपन्यांचा वापर केला आहे.
- पॅँडोरा पेपर घोटाळा
-
- गैरव्यवहाराचा आकडा जगभरात $५ ट्रिलियन ते $३२ ट्रिलियन ऐवढा आहे.
- भारतीयांचा समावेश
-
- सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर, आनंद मेहता, अनिल अंबानी, नीरव मोदी, किरण मुजूमदार शॉ, जॅकी श्रॉफ, नीरा राडिया इ.
- जागतिक पातळीवर करचुकवेगिरी सुरू असून त्यामुळे असमानता वाढत आहे.
- ऑक्सफॅमने म्हटले आहे, यासारख्या प्रकारामुळेच हवामान बदलल्यासारख्या मुद्द्यावर राजकीय नेते पैसे नसल्याचे सांगतात व रोजगारनिर्मितीसाठी त्यांच्याकडे निधी नसतो.
- पॅँडोराज पेपर्स हा २०१६ मधील पनामा पेपर्स सारखाच शोध पत्रकारितेचा भाग आहे.
- एकूण ३ टेराबाईट्स इतकी माहिती असून त्याची तुलना स्मार्टफोनमधील सात लाख पन्नास हजार छायाचित्रांशी होऊ शकते.
- १९७० पासूनच्या नोंदी यात आहेत. जास्तीत जास्त माहिती १९९६-२०२० या काळातील आहेत.