नाना पटोले काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष

नाना पटोले काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष

    • केंद्रीय काँग्रेस समितीने नव्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली.
    • त्यानुसार नाना पटोले यांना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे देण्यात आली आहेत.
    • नाना पटोले यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये झालेले फेरबदल:

 

अ) प्रदेशाध्यक्ष – नाना पटोले

ब) उपाध्यक्ष – 

१) मराठवाडा – कैलास गोरंट्याल, एम. एस. शेख

२) उत्तर महाराष्ट्र – गिरीश चौधरी, शरद आहेर

३) विदर्भ – रणजित कांबळे

४) कोकण – हुसेन दलवाई, माणिकराव जगताप

क) कार्यकारी अध्यक्ष –

१) शिवाजीराव मोघे

२) बसवराज पाटील

३) कुणाल पाटील

४) चंद्रकांत हंडारे

५) नसीम खान

६) प्रणिती शिंदे

ड) ३७ सदस्यांचे संसदीय मंडळ

इ) १९ सदस्यीय स्थानिक स्तरावरील निवडणुकांची रणनिती ठरवण्यासाठी समिती

ई) स्किनींग व समन्वय समिती

फेरबदलाचे कारण –

  • २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून एक जागा व विधानसभेत ४४ जागा मिळवल्या.
  • यासाठी महाराष्ट्रात परत पाय – रोवण्यासाठी काँग्रेस पक्षाचा हा महत्त्वाचा निर्णय

नाना पटोले

  • भंडारा जिल्ह्यातील साकोली मतदार संघाचे आमदार

राजकीय प्रवास

  • छावा या युवा संघटनेच्या माध्यमातून समाजकारण व राजकारणास सुरुवात
  • १९९० जिल्हा परिषद सदस्य
  • २००४ – विधानसभेवर निवडून आले
  • २००९ – काँग्रेसमधून बाहेर पडून नंतर भाजपात प्रवेश
  • २०१४ – लोकसभेवर निवडून आले (पक्ष-भाजप)
  • २०१९ – विधानसभा अध्यक्ष (पक्ष- काँग्रेस)

कार्ये

  • शेतकरी तसेच ओबीसींचे मुद्दे
  • ओबीसी जणगणनेचा प्रस्ताव विधानसभेत संमत करून घेतला.
  • नागपूर विधानभवनातील ग्रंथालय युवकांसाठी वर्षभर चालू 
  • ईव्हीएमला पर्याय म्हणून मतपत्रिकेच्या वापरासाठी कायदा करण्याची सूचना

 

विधानसभा अध्यक्षपदासाठी चर्चेतील नावे

 

अ) संग्राम थोपटे

ब) सुरेश वरपूडकर

क) अमीन पटेल

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now