नागालँडमध्ये अफ्स्पाच्या अमंलबजावणीकरता ६ महिन्यांची वाढ

नागालँडमध्ये अफ्स्पाच्या अमंलबजावणीकरता ६ महिन्यांची वाढ

  • केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार ३० डिसेंबर २०२१ पासून नागालँडमध्ये पुढील सहा महिने आर्म्ड फोर्स स्पेशल पॉवर ॲक्ट, १९५८ (AFSPA) लागू राहील.
  • कोन्याक सिव्हिल सोसायटी या संस्थेद्वारे प्रामुख्याने या कायद्यास विरोध केला जात आहे.
  • केंद्र सरकारने नागालँडला ‘अशांत प्रदेश’ म्हणून घोषित केले आहे.

काय आहे अफ्स्पा?

१) या कायद्यान्वये लष्कराला पाच किंवा त्याहून अधिक लोकांना एकाच ठिकाणी जमण्यास विरोध करता येतो.

२) या कायद्यान्वये लष्कराला इशारा देऊन गोळीबार तसेच वॉरंटशिवाय कोणालाही अटक करण्याचा अधिकार दिला आहे.

३) गोळीबारात कुणाचा बळी गेल्यास त्या सैनिकावर खटला चालविता येत नाही.

४) राज्य सरकार किंवा पोलिस प्रशासनाने एखाद्या सैनिकाविरुद्ध किंवा लष्कराच्या तुकडीविरुद्ध एफआयआर नोंदविल्यास न्यायालयात खटला चालवण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी आवश्यक असते.

पार्श्वभूमी

  • नागालँडमधील मोन जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या गोळीबारात काही नागरिक ठार झाले होते. या घटनेचे पडसाद ईशान्य भारतासह देशभरात उमटले. त्यानंतर या ठिकाणी विविध राजकीय पक्ष, मानवाधिकार संघटनांद्वारा हा कायदा मागे घेण्यासाठी मागणी केली जात आहे.
  • पूर्वी केवळ आसाम व मणिपूर या राज्यांसाठीच लागू असलेला हा कायदा पुढे अरुणाचल प्रदेेश, मेघालय, मिझोराम आणि नागालँड या राज्यांची स्थापना झाल्यानंतर त्यांनाही लागू झाला.

कायद्यासंबंधित विविध समित्या :

अ) जीवन रेड्डी समिती, २००४

  • २००४ मध्ये ईशान्येकडील राज्यांमध्ये कायद्याच्या तरतुदींचा आढावा घेण्यासाठी न्यायमूर्ती बी. पी. जीवन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती नेमण्यात आली होती.
  • या समितीने AFSPA रद्द करण्याची शिफारस केली होती तसेच बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा, १९६७ अंतर्गत सशस्त्र दल व निमलष्करी दल अधिकार स्पष्टपणे निर्दिष्ट करावे व सशस्त्र दल तैनात असलेल्या प्रत्येक जिल्ह्यात तक्रार कक्ष स्थापन केले जातात, अशी शिफारस करण्यात आली होती.

ब) दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग

  • सार्वजनिक सुव्यवस्थेवरील दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या पाचव्या अहवालात AFSPA रद्द करण्याची शिफारस करण्यात आली, मात्र या शिफारसींची अंमलबजावणी झालेली नाही.

कोन्याक

  • नागालँडमधील सगळ्यात मोठी जमात म्हणजे कोन्याक व त्यानंतर अनुक्रमे आओ, तांगखुल, सेमा व अंगामी या जमाती येथे आढळतात.
  • कोन्याक याचा अर्थ ‘काळे केस असलेले पुरुष’ असा आहे, तर या शब्दाचा उगम ‘व्हाओ’ म्हणजे डोके तर ‘न्याक’ म्हणजे काळा या शब्दांतून झाला आहे.
  • मोन जिल्ह्यात आढळणाऱ्या या जमातीच्या क्षेत्रास लँड ऑफ आंघ्स्‌ (Land of Anghs) असेही म्हटले जाते.
  • उत्सव – ऑलिंगमन्यू, आओनिमो व लाऊन ओंग्मो

Contact Us

    Enquire Now