नव्या संसद भवनात हौदाची रचना बदलण्याचा प्रस्ताव सभापतींनी फेटाळला

नव्या संसद भवनात हौदाची रचना बदलण्याचा प्रस्ताव सभापतींनी फेटाळला

 • संसदेमध्ये पीठासीन अधिकाऱ्यांच्या समोरील हौद (वेल) म्हणजे लक्ष वेधण्यासाठी विरोधकांच्या गोंधळाचे हक्काचे स्थान आहे.
 • गोंधळी खासदारांना या वेलमध्ये शिरकाव करता येणार नाही अशी रचना नव्या संसद भवनात असा प्रस्ताव सभापतींपुढे मांडण्यात आला.
 • लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहामध्ये होणारा विरोध हे जिवंत लोकशाहीचे लक्षण असे सांगून हा प्रस्ताव फेटाळला आहे.
 • सर्वोच्च न्यायालयाने संसदेच्या नव्या इमारतीबरोबरच सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या बांधकामास मान्यता दिली आहे.

 

नव्या संसद भवनाच्या इमारतीची रचना

 

 • विस्तार : ६५००० चौ किमी; जमिनीखाली – १६.९२१ चौ. किमी
 • आकार : त्रिकोणी
 • आसन व्यवस्था : लोकसभा – ९०० पेक्षा अधिक
 • राज्यसभा – ४००
 • बांधकाम – टाटा कंपनी (६१.१ कोटी रुपयांची बोली)
 • डिझाईन : विमल पटेल (अहमदाबाद यांनीच सेंट्रल विस्टा प्रकल्पाचा आराखडा तयार केला आहे.)
 • खर्च : ८५० कोटी
 • २०२२ पर्यंत बांधकाम पूर्ण होण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे.
 • इतर बाबी : सभागृहांच्या आसनव्यवस्थेत प्रेक्षक व माध्यमांचे प्रतिनिधी, लोकसभेच्या सभापतींचे पाहुणे, परदेशी पाहुणे, राज्यसभा सदस्य, विशेष अतिथी यासाठी राखीव सज्जांचा समावेश आहे, याबाबत निर्णय झाल्याचे समजते.
 • नव्या संसद रचनेबाबत संसदीय कामकाज मंत्रालय संसदीय सचिवालयाशी विचारविनिमय करून लोकसभेचे सभापती त्यासंबंधी आढाव्याचे सादरीकरण करत आहेत.

Contact Us

  Enquire Now