नवीन स्टार्टअप्सना एक हजार कोटींचा निधी
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 जानेवारीस स्टार्टअप कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ‘प्रारंभ स्टार्टअप इंडिया समिट’ मध्ये या भांडवली पॅकेजची घोषणा केली.
- स्टार्टअप इंडियास पाच वर्षे पूर्ण झाले आहेत.
- देशातील 80 टक्के जिल्हे स्टार्टअप्सचे घटक असून 45 टक्के स्टार्टअप्स हे छोट्या शहरांतील आहेत.
- देशात 44% कंपन्यांमध्ये महिला संचालक आहेत.
- पंतप्रधानांनी बिमस्टेकचे सदस्य देशांमधील युवा संशोधकांशी संवाद साधला.
- यावेळी त्यांनी ‘स्टार्टअप इंडियाची उत्कांती’ या विषयावरील पुस्तकाचे प्रकाशन केले.
शेतीला बूस्टर डोस –
- कृषी आणि अन्नक्षेत्रातील नवीन संधी लक्षात घेऊन कृषी पायाभूत निधीची उभारणी.
- शेतीशी निगडित पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी एक लाख कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
स्टार्टअप्सना बीज भांडवल
- स्टार्टअप्सना सुरुवातीच्या टप्प्यात अर्थसहाय्य करण्यासाठी हा निधी.
- नवनवीन स्टार्टअप सुरू होण्यास व त्यांच्या संख्येत वाढ होण्यास मदत होईल.
- सध्या देश ‘युवकाचे, युवकांकरवी, युवकांसाठी’ या मंत्रावर आधारित स्टार्टअप व्यवस्था निर्माण करण्याच्या दिशेने प्रयत्नशील आहे.
- ‘स्टार्टअप चॅम्पियन्स’ या विशेष कार्यक्रमास सुरुवात.
- बारा आठवड्यांचा हा विशेष कार्यक्रम असून दूरदर्शनवरून रविवारी सायंकाळी सहा वाजता, डीडी न्यूज आणि डी. डी. इंडिया या वाहिन्यांवरून शनिवारी अनुक्रमे रात्री नऊ आणि दहा वाजता प्रसारित करण्यात येईल.
स्टार्टअप इंडिया –
घोषणा – 15 ऑगस्ट 2015
सुरुवात – 16 जानेवारी 2016
स्टार्टअप म्हणजे कोण?
अ. उद्योग स्थापन झाल्यापासून 10 वर्षे.
ब. बायोटेक्नॉलॉजी उद्योग असेल तर 10 वर्ष.
क. वार्षिक उलाढाल 100 कोटींपर्यंत असावी.
ड. गुंतवणूकदारांना समभाग वितरण 25 कोटी रुपये मूल्यांपर्यंत करमुक्त.
इ. अनिवासी भारतीयांची गुंतवणूक 25 कोटी रुपये मूल्यापर्यंत करमुक्त