नवीन आसियान (ASEAN) भारत कृषी योजना – २०२१-२५
- १२ सप्टेंबर २०२० रोजी आसियान-भारत (Association of South East Nations) परिषद पार पडली.
- या परिषदेचे अध्यक्ष – भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर व थायलंडचे उपपंतप्रधान व परराष्ट्रमंत्री डॉन प्रमुद्वीनाई हे होते. (व इतर देशांचे परराष्ट्रमंत्री सदस्य होते.)
- या कृती योजनेमध्ये व्यापार, सागरीसुरक्षा व दहशतवादविरोधी क्षेत्रात अधिक सहकार्य त्यासह कोविड-१९ महामारी विरोधात लढण्यासाठी सहकार्य करण्यावर चर्चा करण्यात आली.
महत्त्वाचे मुद्दे
१) आसियान – भारत – २०१६-२० कृती योजनेचा आढावा घेण्यात आला.
२) नोव्हेंबर २०१९ रोजी बँकॉक येथे झालेल्या १६ व्या शिखर परिषदेतील निर्णयांचा आढावा घेण्यात आला व येणार्या १७ व्या परिषदेची तयारी करण्यात आली.
- आसियान-भारत २०२१-२५ कृती योजना
- आसियान व्हिजन – २०२५ कडे वाटचाल करण्यासाठी दोन्ही बाजू आर्थिकदृष्ठ्या व विकासाचे अंतर कमी करण्यासाठी व कनेक्टीव्हीटी वाढवण्यासाठी मदत करतील.
- या योजनेत भारताचा सहअध्यक्षपदासह सक्रिय सहभाग सागरीसुरक्षा, आपत्ती निवारण, सायबरसुरक्षा, संयुक्त सराव इ. सहकार्याला बळकटीकरणाची कल्पना आहे.
- UNCLOS (United Nation Convention on the Law Of Sea) अंतर्गत दोन्ही बाजू सागरी सुरक्षा, जलवाहतूक व ओव्हरफ्लाईट स्वातंत्र्य, मुक्त व्यापार, शांततापूर्ण तंटे सोडवण्यासाठी प्रोत्साहन देतील.
- तसेच आसियान-भारत मुक्त व्यापार क्षेत्र (AIFTA) तयार करण्यासाठी प्रयत्न करतील.
- या कृती योजनेत ‘भारत-म्यानमार-थायलंड’ हा त्रिपक्षीय महामार्ग बांधणे व पुढे कंबोडिया, लाओस, व्हिएतनामपर्यंत आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार करणे यांचा समावेश आहे.
- आसियान (ASEAN – Association of South-East Nations)
- स्थापना – ८ ऑगस्ट १९६७ (बँकॉक)
- मुख्यालय – जकार्ता (इंडोनेशिया)
- १९६१ च्या Association of South-East Asia चे १९६७ ला आसियान मध्ये रूपांतर
- सदस्य – १० देश
- २०२० चे यजमानपद – व्हिएतनाम
- अध्यक्ष – Nguyen Xuan Phuc
- बोधवाक्य – One Vision, One Identity, One Community
- आसियान क्षेत्राची लोकसंख्या – १.८५ अब्ज जगाच्या एक चतुर्थांश
- GDP – ३.८ ट्रिलियन डॉलर्स
- भारतातील गुंतवणूक – ७० अब्ज डॉलर्स