ध्रुवास्त्राची यशस्वी चाचणी
- ओदिशातील बालासोर येथे भारताच्या हेलिकॉप्टरमधून सोडण्याच्या धु्रवास्त्राची चाचणी यशस्वी झाली असून यात प्रत्यक्ष हेलिकॉप्टरमधून सोडण्यात आले नव्हते.
- हे रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र असून ते प्रत्यक्षात ‘नाग (हेलिना)’ श्रेणीतील आहे. त्याचे नामकरण ध्रुवास्त्र असे करण्यात आले.
- हेलिना हे तिसर्या पिढीचे क्षेपणास्त्र असून त्याचा मूळ उद्देश शत्रूच्या रणगाड्यांचा वेध घेणे हा आहे. प्रगत हलक्या हेलिकॉप्टरमधून ते सोडता येते. सर्व हवामानात वापरता येणारे हे क्षेपणास्त्र असून उंचीवरून हल्ला व थेट हल्ला असे दोन्ही प्रकार यात शक्य आहेत.
- हेलिना शास्त्रास्त्र प्रणाली अजून लष्करात तैनात करण्यात आलेली नाही. हेलिनाचाच भाग असलेले धु्रवास्त्र भारतीय हवाई दलात तैनात करण्याचे काम चालू आहे. या क्षेपणास्त्राची क्षमता ७ कि.मी. असून एकाच वेळी आठ क्षेपणास्त्रे हेलिकॉप्टरला लावून सोडली जाऊ शकतात. त्यासाठी दोन प्रक्षेपकांचा वापर केला जाऊ शकतो.