दोन धावपट्ट्या असणारे उत्तरप्रदेश देशातील पहिले राज्य
- उत्तर प्रदेशातील पूर्वांचल महामार्गावर कुरेभरजवळ ३,३०० मीटर लांबीच्या धावपट्टीचे काम पूर्ण झाले आहे.
- त्यामुळे महामार्गावर लढाऊ विमानांच्या आपत्कालीन वापरासाठी दोन धावपट्ट्या असणारे उत्तरप्रदेश देशातील पहिले राज्य ठरले आहे.
- लखनौ – आग्रा महामार्गावर पहिली धावपट्टी असून २०१६मध्ये हवाई दलाने याची चाचणी केली.
- हवाई दलाच्या मिराज २०००, जग्वार, सुखोई – ३० आणि सुपर हर्क्युलस ही लढाऊ विमाने लखनौ – आग्रा महामार्गावर यशस्वीरीत्या उतरली आहेत.
धावपट्टी उभारण्याचा उद्देश :
- आपत्कालीन परिस्थितीत लढाऊ विमानाचे लँडिंग आणि टेक ऑफ
- चीन आणि पाकिस्तानविरुद्ध युद्धस्थितीत उपयोग
राष्ट्रीय महामार्गावर लढाऊ विमानासाठी धावपट्टी विकसित करणारे प्राधिकरण
अ) राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण
ब) नॅशनल एक्स्प्रेसचे अॉथॉरिटी ऑफ इंडिया
क) भारतीय वायू दल
सरकारची भूमिका :
- लढाऊ विमांनाद्वारे आपत्कालीन लँडिंगसाठी धोरणात्मक ठिकाणी राष्ट्रीय महामार्गावर २९ धावपट्ट्या उभारण्याचे केंद्राचे नियोजन
- यात पुढील ३ भागांचा समावेश होतो-
अ) जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, उत्तराखंड, मणिपूर आणि पश्चिम बंगाल राज्यातील महामार्ग
ब) ओदिशा, झारखंड, छत्तीसगडमधील माओवादी भाग
क) तमिळनाडू आणि आंध्रप्रदेश
भारतातील द्रुतगती मार्ग (Expressways)
- जगात एक्स्प्रेसवेची सर्वात कमी घनता भारतात
- सध्या सुमारे १६४५.५ कि.मी. द्रुतगती मार्ग कार्यरत
भारतमाला परियोजना
- सुरुवात : रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयांतर्गत २०१७-१८
घटक :
अ) आर्थिक कॉरिडॉर (५००० कि.मी.)
ब) फीडर कॉरिडॉर (६००० कि.मी.)
क) इंटर कॉरिडोर
ड) राष्ट्रीय कॉरिडोर (५००० कि.मी.)
इ) किनारी रस्ते व बंदर जोडणी (२००० कि.मी.)