देशात सात महिन्यांत 33 हजार टन जैववैद्यकीय कचरा –
- कोरोना साथीमध्ये गेल्या सात महिन्यांत देशामध्ये 32,994 टन जैववैद्यकीय कचरा निर्माण झाला, अशी माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली आहे.
- यामध्ये सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये (5,367 टन) निर्माण झाला. तर यानंतर केरळ (3,300 टन), गुजरात (3,086 टन), तमिळनाडू (2,806 टन) या राज्यांनी जैववैद्यकीय कचरा निर्माण केला.
- कोरोनामुळे ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक कचरा निर्माण झाला. ऑक्टोबर महिन्यात 5,500 टन कचरा निर्माण झाला. या कचऱ्याची 198 जैववैद्यकीय कचरा केंद्रांमध्ये विल्हेवाट लावण्यात आली.
- या कचऱ्यात जुने झालेले पीपीई संच, मास्क, हातमोजे, रक्ताचे नमुने ड्रेसिंग प्लास्टर, इंजेक्शनच्या सुया, सिरिंज आदींचा समावेश होता.