देशातील सायबर सुरक्षा धोरणांचे अनावरण करणारे तामिळनाडू हे पहिले राज्य

देशातील सायबर सुरक्षा धोरणांचे अनावरण करणारे तामिळनाडू हे पहिले राज्य

  • १९ सप्टेंबर २०२० रोजी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडप्पडी के. पलानीस्वामी यांनी तामिळनाडू सायबर सुरक्षा धोरण २०२०, तामिळनाडू ब्लॉकचेन पॉलिसी २०२० आणि तामिळनाडू सेफ अँड एथिकल AI पॉलिसी २०२० (ABC पॉलिसी म्हणून ओळखले जाणारे) जाहीर केले.
  • नैतिक कृत्रिम प्रज्ञा (एथिकल AI), ब्लॉकचेन आणि सायबर सुरक्षाविषयक धोरण जाहीर करणारे हे देशातील पहिले राज्य ठरले.

तामिळनाडू सेफ अँड एथिकल कृत्रिम प्रज्ञा धोरण २०२०

  • कृत्रिम प्रज्ञा (AI) धोरण तामिळनाडूमधील AI संशोधन आणि विकासातील गुंतवणुकीस प्रोत्साहन करेल.
  • हे सरकारच्या डोमेनमध्ये AI च्या समावेशक, सुरक्षित आणि नैतिक वापरासाठी एक फ्रेमवर्क प्रदान करेल.
  • हे AI सहाय्यक निर्णय घेणार्‍या यंत्रणांवर निपक्षता, पारपदर्शकता आणि विश्वास निर्माण करेल.
  • AI आधारित सिस्टमच्या मूल्यांकनासाठी ते सहा-आयामी TAM-DEF फ्रेमवर्कची शिफारस करेल.
  • TAM-DEF (Transparency and audit, Accountability and legal issues, Misuse protection, Digital divide and Data deficit, Ethics and Fairness and equity)
  • हे सरकारच्या विधिमंडळ, न्यायपालिका आणि कार्यकारिणीत AI चा अवलंब करण्याचे लक्ष्य ठेवेल.

तामिळनाडू ब्लॉकचेन धोरण २०२०

  • हे धोरण सरकारी प्रक्रियेत पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणेल आणि ई-गव्हर्नन्समध्ये मोलाची भूमिका बजावेल.
  • यामुळे तामिळनाडूसाठी ब्लॉकचेन बॅकबोन इन्फास्ट्रक्चर नेटवर्क जोडण्यास मदत होईल.
  • ब्लॉकचेन बॅकबोन इन्फास्ट्रक्चर सरकारी प्रक्रिया आणि डेटासाठी एकल सत्य आणि ट्रस्ट अँकर म्हणून काम करेल.

तामिळनाडू सायबर सुरक्षा धोरण २०२०

  • सायबर सुरक्षा धोरण तामिळनाडूच्या सुरक्षा आर्किटेक्चर फ्रेमवर्कच्या माध्यमातून राज्यातील सायबरसुरक्षेशी संबंधित एजन्सींची संपूर्ण व्याप्ती परिभाषित करेल.
  • सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड कम्यूटिंग (C-DAC) च्या संयुक्त विद्यमाने ‘इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ तामिळनाडू लिमिटेड’ (ELCOT) यांनी याचा मसुदा तयार केला आहे.
  • प्रत्येक विभागाची सुरक्षा धोरणे आणि या धोरणांतर्गत असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे सर्वोत्तम पद्धतीने अनुकरण करतील.

तामिळनाडूबद्दल

  • स्थापना – १ नोव्हेंबर १९५६
  • राजधानी – चेन्नई
  • राज्यपाल – बनवारीलाल पुरोहित

Contact Us

    Enquire Now