देशातील पहिली किसान रेल्वे सुरू
- रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे किसान रेल्वेस हिरवा झेंडा दाखवला. (७ ऑगस्ट २०२०)
- या रेल्वेद्वारे पालेभाज्या व कृषी उत्पादनांची ने-आण केली जाणार आहे.
- ही रेल्वे महाराष्ट्राच्या देवळाली (नाशिक) स्थान ते बिहारच्या दानापूर स्थानकापर्यंत धावेल.
- किसान रेल्वेत वातानुकुलित डब्बे असून १७ टनपर्यंत माल वाहून नेण्याची क्षमता या ट्रेनमध्ये आहे.
- यामध्ये पालेभाज्या, फळे, मांस, मासे आणि दुधासारख्या नाशवंत पदार्थाची ने-आण केली जाणार आहे.
- आठवड्यातून एकदा ही रेल्वे धावणार असून किसान रेल्वेद्वारे नाशवंत माल अल्पावधीत बाजारात आणला जाणार आहे.
- २०२०-२१ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात या प्रकारच्या रेल्वेची घोषणा केंद्रीय अर्थंमत्री निर्मला सीतारमय्या यांनी केली होती.
- या रेल्वेस महाराष्ट्रातून बिहारला जाण्यासाठी ३२ तासांचा कालावधी लागणार आहे.
- देवळाली स्थानकातून निघाल्यावर ही रेल्वे नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, बुरहानपूर, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, कटनी, माणिकपूर, प्रयागराज, बक्सर २११ स्थानकावर थांबणार आहे.