देशाची पहिली न्यूमोकॉकल काँज्युगेट लस विकसित

देशाची पहिली न्यूमोकॉकल काँज्युगेट लस विकसित

  • देशाचे आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशाच्या पहिल्या न्यूमोकॉकल काँज्युगेट लसीचे उद्‌घाटन केले.
  • सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने बिल अँड मिलिंडा गेट्‌स्‌ फाउंडेशन यांच्या संयुक्त भागीदारीतून न्यूमोसिल ही लस निर्माण करण्यात आली आहे.
  • जागतिक स्तरावर पाच वर्षांखालील सर्वाधिक बालकांच्या मृत्यूचे कारण न्यूमोनिया हे आहे, त्यापैकी 20 टक्के बालके भारतीय आहेत.
  • आतापर्यंत लस आयात करत असल्यामुळे ती देशातील सर्व बालकांसाठी देणे शक्य नव्हते. आता सिरमने तयार केलेली संपूर्ण भारतीय बनावटीची लस भारतासह जगातील बालमृत्यू रोखण्यास अशा सर्व निकषांवर संपूर्ण स्वदेशी बनावटीची ही लस भारतातील आणि इतर गरीब व विकसनशील देशांमधील बालकांना न्यूमोनियापासून संरक्षण देण्यास उपयुक्त ठरणार आहे.
  • 2018 साली भारतात पाच वर्षाखालील 67800 मुले न्यूमोनियामुळे दगावली होती त्यामुळे एकात्मिक लसीकरण कार्यक्रमात न्यूमोकॉकल लसीचा समावेश करण्याची शिफारस जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आली आहे.

 

  • न्यूमोकॉकल काँज्युगेट लस

 

  • शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी अशक्त असलेल्या रोगकारक प्रतिजनांना (अँटिजन) सशक्त प्रतिजनांबरोबर शरीरात सोडले जाते. त्यामुळे रक्तातील पेशींची संबंधित आजारांच्या प्रतिजनांशी लढण्याची शक्ती विकसित होते. त्यालाच काँज्यूगेट लस असे म्हणतात. न्यूमोनियासाठी तयार करण्यात आलेल्या अशा लसीला न्यूमोकॉकल काँज्यूगेट लस असे म्हणतात.
  • न्यूमॉसिसची वैशिष्ट्ये – 
  1. देशातील पहिली न्यूमोकॉकल काँज्यूगेट लस
  2. जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता असलेली ही लस पाच वर्षांखालील मुलांसाठी आहे.
  3. गांबीया, आफ्रिकेमध्ये पाच वैद्यकीय चाचण्या घेण्यात आल्या कोणतेही साईड इफेक्ट नाहीत.
  4. बिल आणि मिलिंडा गेट्‌स फाउंडेशन पीएटीएच या संस्थांच्या सहकार्याने मागील दशकापासून या लसीवर संशोधन सुरू होते.
  5. एकूण तीन डोस द्यावे लागतील. दोन डोस महिन्यांच्या अंतराने आणि शेवटचा डोस सहा महिन्यांनंतर.
  • सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया – या संस्थेची स्थापना 1966 मध्ये सायरस पूनावाला यांनी केली असून त्या संस्थेचे मुख्यालय पुणे येथे आहे. सध्या या संस्थेचे अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला हे असून आदर पूनावाला हे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
  • उत्पादन संख्या लक्षात घेता सिरम ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे.
  • सिरमच्या लसी 170 देशांमध्ये वापरल्या जात असून जगातल्या प्रत्येक तिसऱ्या मुलाचे लसीकरण या कंपनीच्या लसीने केले जाते.
  • सिरमची पहिली स्वदेशी न्यूमोकॉकल काँन्ज्युगेट लस बाजारात ‘न्युमोसिल’ या ब्रँडखाली माफक दरात उपलब्ध होईल.

न्यूमोनिया या रोगाविषयी 

  • हा जीवाणूजन्य रोग आहे.
  • जीवाणूचे नाव – डायप्लोकॉकस न्यूमोजी. 
  • परिणाम (अवयव) – फुफ्फुसावर परिणाम होतो.
  • प्रसार – हवेतून प्रसार होतो.

चिन्ह व लक्षणे 

  • ताप तसेच श्वास घेण्यासाठी त्रास छातीत दुखणे.

विषाणूंमुळे न्यूमोनिया हा रोग झाल्यास त्यास सार्स असे म्हणतात. काही व्यक्तींना न्यूमोनिया झाल्यास दोन्ही फुफ्फुसांवर परिणाम झाल्यास त्यास डबल/दुहेरी न्यूमोनिया असे म्हणतात.

  • जीवाणू – साधारणत: एकपेशीय असतात. विषाणूपेक्षा आकाराने मोठे असतात. यांमध्ये केंद्रक नसून गुणसूत्रे मुक्त असतात. जीवाणूंना चांगली अशी पेशीरचना असते ज्यात पेशीभित्तिका, पेशीपटल तसेच पेशीरस व पेशी अंगके असतात. जीवाणू हे फायदेशीरसुद्धा असतात व बहुतांश जीवाणू हे घातक असतात. पृथ्वीवर जीवाणू हे मानवापेक्षा जास्त काळापासून आहेत.

 

जीवाणूजन्य रोग

 

रोग जीवाणूचे नाव प्रसार अवयव उपचार
विषमज्वर सालमोनेला टायफी दूषित अन्न आणि पाणी आतडे (बीडालटेम्प) क्लोरोमायसेरीन
क्षयरोग मायकोबॅक्टेरियम न्यूबरकुली थुंकी, हवेद्वारे द्रवबिंदू मुख्यत: फुफ्फुस BCG लस, स्ट्रेप्टोमायसिन, DOTS
कॉलरा विब्रिओ कॉलरी दूषित अन्न आणि पाणी मोठी आतडे हाफकीन लस DRS
घटसर्प कार्नबक्टेरियम डिप्थेरी हवेमार्फत श्वसनसंस्था DPT लस, पेनिसीलीन
डांग्या खोकला हिमोफिलस परट्यूसिस हवेमार्फत श्वसनसंस्था DPT
धनुर्वात क्लास्ट्रिडीयम टिटॅनी ओल्या जखमा मध्यवर्ती चेतासंस्था DPT
कुष्ठरोग मायकोबॅक्टेरियम लेर्पी रक्त, द्रवबिंदू परिघीय चेतासंस्था डॅपसोन

Contact Us

    Enquire Now