दिल्ली शालेय शिक्षण मंडळ स्थापन करणार

 

दिल्ली शालेय शिक्षण मंडळ स्थापन करणार-

  • सीबीएससीच्या छायेतून बाहेर पडण्यासाठी वेगळे शिक्षण मंडळ स्थापन करण्याचे दिल्ली मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली.
  • स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच दिल्लीतील शाळा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) छायेतून बाहेर पडून स्वतःच्या वेगळ्या शिक्षण मंडळांतर्गत काम करतील.
  • दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश असला तरीही शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक परिवहन सेवा सहकारी क्षेत्रे राज्य सरकारच्या अखत्यारीत येतात.
  • दिल्लीत सुमारे 1000 सरकारी 1700 खासगी शाळा आहेत. त्यातील बहुतांश शाळा सीबीएसईशी निगडित आहेत. पहिल्या वर्षी यातील 20 ते 25 सरकारी शाळा या मंडळांतर्गत येतील.
  • पुढील वर्षभरात दिल्लीतील खासगी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांसोबत चर्चा करून त्यांचा राज्य शिक्षण मंडळामध्ये समावेश करण्याचा निर्णय घेण्यात येईल.
  • दिल्ली सरकारने शिक्षण विभागाची अर्थसंकल्पीय तरतूद तब्बल 25 % केली आहे. दर्जेदार शिक्षणाकडे लक्ष देण्यासाठी प्रत्येक शाळेत व्यवस्थापकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • या अंतर्गत दोन स्वतंत्र मंडळे स्थापन केली जातील, एका बोर्डाची स्वतंत्र कार्यकारणी असेल व एक मुख्य अधिकारी (सीईओ) त्याचा प्रमुख असेल.
  • दुसरी समिती शिक्षणमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण, उद्योगक्षेत्र, सरकारी व खासगी शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य असतील.
  • वेगळ्या शिक्षण मंडळाचे मुख्य उद्देश– 

 

  1. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती जागवणे.
  2. विद्यार्थी पुढे कोणत्याही क्षेत्रात गेला तरी त्याच्या यशाची हमी देणे.
  3. धर्म व जातीच्या जंजाळातून बाहेर काढून विद्यार्थ्यांना चांगले माणूस बनवणे.
  4. विद्यार्थ्यांच्या चौफेर व्यक्तिमत्त्व विकासावर भर देणे.
  5. रोजगाराच्या सर्वाधिक संधी देणारा अभ्यासक्रम तयार करणे.

Contact Us

    Enquire Now