दिल्ली मास्टर प्लॅन – २०४१
- दिल्ली विकास प्राधिकरणाने (डीडीए) दिल्ली मास्टर प्लॅन – २०४१ ला मान्यता दिली. ज्याची अंमलबजावणी ही लोकांच्या शिफारसी व आक्षेपांनंतर केली जाईल.
- मास्टर प्लॅन हा शहरातील जमीन- मालकीच्या एजन्सीद्वारे विकसित केलेले भविष्यातील शहराच्या विकासाला चालना देणारे नियोजक व्हिजन डॉक्युमेंट असते.
काय आहे दिल्ली मास्टर प्लॅन – २०४१?
अ) दिल्लीचा सध्या अस्तित्वात असलेला मास्टर प्लॅन – २०२१ मध्ये संपुष्टात येणार आहे. तर सद्यस्थितीचा आढावा घेऊन हा नवीन प्लॅन पुढील २० वर्षांसाठी वैध ठरणार आहे.
ब) यात लोकसंख्या, अर्थव्यवस्था, गृहनिर्माण, वाहतूक, समुदाय सुविधा आणि जमिन वापर यांसारख्या बाबी लक्षात घेऊन शहरांसदर्भात विश्लेषण, शिफारस आणि प्रस्तावांचा समावेश आहे.
क) स्थलांतरित लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेऊन ही नवीन योजना पार्किंगची जागा देण्यासह भाडेतत्त्वावरील अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने कार्य करेल.
ड) शाश्वत विकास लक्ष्यांच्या (एसडीजी) पुढील तरतुदी पूर्ण करण्यावर हवा प्लॅनचा भर :
शाश्वत विकास लक्ष्य | तरतूद |
६ | स्वच्छ जल आणि स्वच्छता |
११ | शाश्वत शहरे आणि समुदाय |
१४ | पाण्याखालील जीवन |
१५ | जमिनीवरील जीवन |
पर्यावरणीय प्रदूषणावरील उपाययोजना
अ) वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी हरित इंधन तसेच सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय निवडणे.
ब) यमुना नदी तसेच विविध तलाव, नैसर्गिक नाले व बाओली येथून घेतलेल्या पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासंदर्भातही लक्ष दिले गेले आहे.
क) मसुद्यात यमुना नदीजवळील बफर झोनचा विकास कसा करता येईल याचाही अभ्यास केला आहे.
ड) प्लॅनअनव्ये नदीच्या संपूर्ण काळावर जेथे जेथे शक्य असेल तेथे ३०० मीटर्स रुंदीचा हरित बफर झोन राखला जाईल.
२०२१ प्लॅनपेक्षा वेगळा कसा?
i) सर्व देशभर (खंडभर) पसरलेल्या कोरोनामुळे प्रचंड बदल झाला आहे. त्याचप्रमाणे वाढत्या लोकसंख्येमुळे संकुचित होणारी जागा आणि बेरोजगारीतही वाढ झाली आहे.
ii) या मास्टर प्लॅन २०४१ चे उद्दिष्ट आपत्कालीन परिस्थितीत आश्रयस्थान. विलगीकरण कक्षासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी जागा विकसित करणे.
iii) हरित विकास आणि अधिवास विकासासाठी अधिक मोकळे क्षेत्र विकसत करणे. तसेच यांत्रिक वेंटिलेशन सिस्टिमवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी विकेंद्रित कार्यक्षेत्र निर्माण करणे.
iv) रात्रीची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी या प्लॅनमध्ये सांस्कृतिक उत्सव, बस, मेट्रो सुविधा, क्रीडा सुविधा, डीडीएच्या नाइट लाइफ सर्किट योजनेतील किरकोळ स्टोअरवर भर देण्यात आला आहे.
आव्हाने :
- मूलभूत सेवांमध्ये पाणी आणि स्वच्छता तसेच इतर सुविधांचा समावेश नसणे.
- इतर समस्यांमध्ये काही मालमत्तांची कायदेशीरता, अरुंद रस्ते, गर्दी, व्यावसायिक आणि निवासी वापरांसंबंधी संघर्ष, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तसेच पाणी साठणे आदींचा समावेश आहे.
- डीडीए, दिल्ली जल बोर्ड, पूर आणि पाटबंधारे विभाग तसेच विविध महानगरपालिका यांसारख्या बहुसंख्य एजन्सीजमध्ये समन्वयाचा अभाव
आवश्यकता :
- या विविध एजन्सीच्या बहुविधतेचे आव्हान सरकारने हाताळावे, ज्यामुळे त्यांच्यात समन्वय व सहकार्य वाढीस लागेल.
- जलसंपदा व नाल्यांच्या साफसफाईच्या योजनांचे काटेकोरपणे पालन करणे.
- यमुना नदीतील कचऱ्यावर निर्बंध घालणे.