
दिल्लीत इलेक्ट्रिक वाहनांसाठी नवे धोरण जाहीर
- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील प्रदूषणाचा सामना करण्यासाठी सरकारने दिल्लीत इलेक्ट्रिक वाहनांसाठी नवे धोरण जाहीर केले आहे.
- यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, ‘पुढील पाच वर्षांत ५ लाख नवीन इलेक्ट्रिक वाहकांची नोंदणी होईल. इलेक्ट्रिक वाहन धोरण राबवण्यासाठी इव्ही सेलची स्थापना करण्यात येईल. एका वर्षात २०० चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचा आमचा मानस आहे. यामुळे हवेचे प्रदूषण कमी होईल तसेच रोजगारही वाढतील.’