दिल्लीतील केजरीवाल सरकारच्या ‘आनंददायी शिक्षण’ पद्धतीचे विदेशांत आकर्षण

दिल्लीतील केजरीवाल सरकारच्या ‘आनंददायी शिक्षण’ पद्धतीचे विदेशांत आकर्षण

  • आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री असलेल्या दिल्ली सरकारची ‘आनंददायी शिक्षण’ पद्धत (पॅटर्न) अनेक देशांना आकर्षित करत आहे.
  • या पॅटर्नमध्ये शिक्षणातून मूल्यशिक्षण आणि मूल्यशिक्षणातून मानवी जीवनमूल्यांची शिकवण देण्यात येते. दिल्लीसह अनेक विद्यापीठांनीही या पॅटर्नची आपल्यालाही गरज असल्याचे सांगितल्यामुळे हा पॅटर्न येत्या काळात शिक्षण क्षेत्रात मोठी भूमिका बजावणार आहे.
  • प्रत्येक विद्यार्थी हा आपल्या देशाचे भवितव्य आहे. त्याला आपल्या जीवनातील प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्यासाठी मूल्यशिक्षण आणि त्याचा आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. तोच आम्ही आनंददायी शिक्षणातून विद्यार्थ्यांना देत आहोत. यातूनच एक नवीन पद्धत आम्ही विकसित केली असल्याचे दिल्लीचे शिक्षणमंत्री मनोज सिसोदिया यांनी सांगितले.
  • या पद्धतीमध्ये वर्गनिहाय आठवड्याचे वेळापत्रक निश्चित केल्या जाते. कोणत्याही प्रकारची सक्ती विद्यार्थ्यांवर नसते. एखाद्या विषयावर विद्यार्थ्यांचे मत घेऊन चर्चा घडवल्या जातात. आठवड्याच्या पहिल्या दिवसाची सुरुवात ध्यान प्रक्रियेने होते. तसेच नाते संबंधाचा विचार, शिक्षक-विद्यार्थी संबंध शिक्षणाचे मूल्यासह चर्चा केली जाते.
  • धर्म, जाती, पंथ, भेद, पौराणिक, काल्पनिक कथा, धार्मिक कथा, आदींच्या पलिकडे जाऊन यामध्ये मूल्यधिष्ठित शिक्षण प्रणाली आणि मानवी मूल्यांचा विकास होऊन जगण्यासाठी जीवनमूल्ये किती महत्त्वाची आहेत यावर भर दिला जात आहे.
  • या शिक्षणाचा केंद्रबिंदू हा विद्यार्थी आहे. सभाधीटपणा आणि विद्यार्थ्याची आकलनक्षमता वाढविण्यावर यामध्ये भर दिला जातो.
  • दिल्ली सरकारच्या या पथदर्शी प्रकल्पाचे आकर्षण वाढत आहे. तब्बल १३ देशांनी हा पॅटर्न राबविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दिल्ली सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व सरकारी शाळांमध्ये मागील दोन वर्षांपासून आनंददायी शिक्षणाचा हा पॅटर्न राबवला जात आहे.
  • आम आदमी पक्षाच्या या सरकारने दिल्लीत सुरू केलेल्या महत्त्वपूर्ण योजनांच्या यशस्वितेचे प्रमाण तुलनेने खूपच अधिक आहे. सरकारी शाळांमध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. वर्गातील शेवटच्या विद्यार्थ्याला शिकण्याचे बळ देणारा ‘चुनौती २०१८’ कार्यक्रम असो, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारा ‘कला उत्सव’ असो, शिक्षकांसाठी सुरू केलेला ऑनलाईन क्षमता विकास कार्यक्रम असो किंवा मानसिक आरोग्याच्या जपणुकीबरोबरच लवचिकतेत वाढ करणारा हा आनंददायी शिक्षणक्रम असो, या सर्व उपक्रमांचे परिणाम दिसून आले आहेत.

Contact Us

    Enquire Now