दले खुरसनी मिरचीला जीआय टॅग (भौगोलिक संकेत)
- ईशान्य भारतातील सिक्कीम राज्यामधील लाल मिरचीला ( दले खुरसनी ) केंद्र सरकारच्या DPIIT विभागाने भौगोलिक संकेताचा दर्जा दिला आहे.
- दले खुरसनी मिरची तिच्या तिखट चवीसाठी तसेच औषधी उपयोगांसाठी ओळखली जाते. ही मिरची सिक्कीम, दार्जिलिंग भागात उगवली जात असून फार जास्त उष्ण असते. दले खुरसनी मिरचीला बाजारात चांगलीच मागणी असून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर या मिरचीचा भाव 400 रुपये प्रतिकिलोपर्यंत देखील भिडतो.