दरवर्षी १०० कोटी बालके होतात हिंसेचे शिकार : संयुक्त राष्ट्र संघटना
- प्रथमच संयुक्त राष्ट्रसंघटनेने बालकांवर होणार्या अत्याचारावर ‘Global status Report on Preventing Violence Against Children,२०२०’ हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
- या अहवालानुसार जगभरातील १०० कोटी बालके शारीरिक, मानसिक, लैंगिक अत्याचाराचे शिकार होत आहेत. तर वयवर्षे २ ते १७ मधील प्रत्येक दोनापैकी एक बालक हिंसेला सामोरा जातोय. जगभरातील १२ कोटी बालिका कुठल्या ना कुठल्या प्रकारे वयवर्षे २० च्या अगोदर लैंगिक शोषणाला सामोर्या जातात असेही हा अहवाल म्हणतो.
- आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटना (WHO), युनिसेफ, युनेस्को आणि संयुक्त राष्ट्र संघटनेच्या बाल अत्याचाराविरोधातील कार्यक्रमाचे सचिव यांनी हा अहवाल तयार केला आहे.
- संयुक्त संघटनेने बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी २०१६ साली ‘INSPIRE’ कार्यक्रमाची सुरुवात केली. या अहवालानुसार जगभरातील फक्त ५६% देशांनी INSPIRE कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय धोरणे राबविली आहेत. तर ८०% देशांचा बाल अत्याचाराविरोधाचा राष्ट्रीय कार्यक्रम तयार असल्याचे या अहवालात म्हटले आहे.