तौक्ते चक्रीवादळ (Cyclone Tauktae)

तौक्ते चक्रीवादळ (Cyclone Tauktae)

 • तौक्ते हे अत्यंत तीव्र चक्रीवादळ स्वरूपातील एक उष्णकटिबंधीय चक्रीवादळ होते.
 • पूर्व अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीपजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रूपांतर झाले होते.
 • प्रभावित क्षेत्रे : तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात ही राज्ये तसेच लक्षद्वीप, दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव हे केंद्रशासित प्रदेश.
 • 14 मे 2021 रोजी वादळाची निर्मिती झाली, तर 19 मे 2021 रोजी हे वादळ क्षीण झाले.

या चक्रीवादळाची वैशिष्ट्ये :

 • तौक्ते हे नाव म्यानमार या देशाने दिले आहे.
 • तौक्तेचा बर्मन भाषेतील अर्थ ’गेको’ असा होतो. तौक्ते ही एक सरड्याची प्रजाती असलेल्या हायल व्होकल लिझार्ड आहे.
 • चक्रीवादळाचा वेग – 185 ते 220 किमी प्रति तास
 • मान्सूनपूर्व हंगामात 2010 नंतर ताशी 200 किमी वेगाने वाऱ्याचा वेग असणारे तौक्ते हे दुसरे चक्रीवादळ.
 • सुमारे दोन दशकांनंतर गुजरातला अत्यंत तीव्र चक्रीवादळाच्या श्रेणीमधील चक्रीवादळ धडकले, याआधी 1998 मध्ये कांडला येथे धडकलेल्या चक्रीवादळामुळे सुमारे 4000 लोकांचा मृत्यू झाला होता.
 • तौक्ते चक्रीवादळाचा लँडफॉल गुजरातमध्ये झाल्याने सर्वाधिक हानी झाली.

अरबी समुद्रात निर्माण झालेले चक्रीवादळ :

चक्रीवादळ वर्ष चक्रीवादळ प्रकार विशेष प्रभावित
मेकानू 2018 अत्यंत तीव्र ओमान
वायू 2019 अति गंभीर गुजरात
निसर्ग 2020 गंभीर महाराष्ट्र
तौक्ते 2021 अत्यंत तीव्र गुजरात

अरबी समुद्रातही चक्रीवादळांचे वाढते प्रमाण : 

 • बंगालचा उपसागर व अरबी समुद्र या क्षेत्रात एकत्रितपणे वर्षाला सुमारे पाच चक्रीवादळांची निर्मिती होते.
 • परंतु बंगालचा उपसागर हा अरबी समुद्रापेक्षा अधिक उष्ण असल्याने पाचपैकी चार चक्रीवादळ हे बंगालच्या उपसागरात तर एक अरबी समुद्रात निर्माण होते.
 • मात्र नुकत्याच काही वर्षांपासून, जागतिक तापमानवाढीमुळे अरबी समुद्राचे तापमानही 1.2 ते 1.4° सेल्सियसपर्यंत वाढले आहे, त्यामुळे अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांची संख्या ही वाढत आहे, ते पुढीलप्रमाणे –

चक्रीवादळांची संख्या 

वर्ष अरबी समुद्र बंगालचा उपसागर
2018 3 4
2019 3 5
2020 2 3

Contact Us

  Enquire Now