तुळू भाषेस अधिकृत भाषेचा दर्जा देण्याची मागणी

तुळू भाषेस अधिकृत भाषेचा दर्जा देण्याची मागणी

पार्श्वभूमी :

 • मुख्यत: कर्नाटक आणि केरळमधील तुळू भाषिक सरकारकडे ‘तुळू’ भाषेस अधिकृत भाषेचा दर्जा मिळावा व घटनेच्या आठव्या परिशिष्टात तिचा समावेश करावा, अशी विनंती करत आहे.
 • २०२० मध्येही नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात (NEP) तुळूला समाविष्ट करण्याची मागणी केली होती.

तुळू भाषा :

 • तुळू ही एक द्राविड भाषा असून प्रामुख्याने कर्नाटकच्या दक्षिण कन्नड आणि उडुपी तर केरळमधील कासरकोड या जिल्ह्यांत बोलली जाते.
 • हा प्रदेश अनौपचारिकपणे ‘तुलू नाडू’ म्हणून ओळखला जातो. यासही स्वतंत्र राज्य घोषित करण्याची मागणी येथे होत आहे.
 • २०११च्या जणगणनेनुसार भारतात १८,४६,४२७ तुळूभाषिक लोक राहतात.
 • रॉबर्ट कॅल्डवेल (१८१४ – १८९१) यांच्या ‘द्रविड किंवा दक्षिण – भारतीय कुटुंबातील भाषेचे तुलनात्मक व्याकरण’ या पुस्तकात तुळू ही द्रविड कुटुंबातील सर्वात विकसित भाषांपैकी एक आहे.

अ) तुळू साहित्य आणि कला :

i) १४ ते १५व्या शतकादरम्यान तुळूमधील सर्वात जुने शिलालेख आढळून आले.

ii) पद्‌दन तसेच यक्षगान यांसारख्या लोकगीतांची मौखिक परंपरा.

iii) वर्षातून सुमारे ५ ते ७ तुळू भाषेतील चित्रपट तयार केले जातात.

ब) तुळू शिक्षण :

 • कर्नाटक सरकारने मागील काही वर्षांपासून तुळू भाषा शाळेत वापरण्याची भाषा म्हणून मान्यता दिली आहे.

 भाषेसंबंधित उपाययोजना:

अ) कलम २९ – भारताच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या, कोणत्याही नागरिकांना आपली विशिष्ट भाषा, लिपी किंवा संस्कृती जतन करण्याचा अधिकार आहे.

ब) यूएलू घोषणा (Yuelu Prodamation) :

  • २०१८ मध्ये चीनमधील चांग्शा शहरात युनेस्कोद्वारे आंतरराष्ट्रीय समुदाय, राज्ये सरकारे व इतर स्वयंसेवी संस्थांद्वारे इतरांमध्ये जगातील भाषिक विविधतेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी एकमत व्हावे यावर भर देण्यात आला.

आठव्या परिशिष्टात समावेश झाल्यास मिळणारे फायदे :

अ) साहित्य अकादमीकडून मान्यता :

  • साहित्य अकादमीला ‘भारताची नॅशनल ॲकॅडमी ऑफ लेटर्स’ असेही म्हणतात जी विविध भारतीय भाषेतील साहित्याचे जतन व संवर्धन करते.

ब) अन्य भाषांमध्ये तुळू भाषेतील साहित्याचे अनुवाद.

क) खासदार आणि आमदार अनुक्रमे संसद आणि राज्य विधानसभेमध्ये तुळू बोलू शकतात.

ड) विद्यार्थी नागरी सेवा परीक्षांमध्ये तुळू भाषेचा पर्याय निवडू शकतात.

राज्याची अधिकृत भाषा (भाग १७, कलम ३४३ ते ३५१)

कलम तरतूद
केंद्राची भाषा
३४३ केंद्राची अधिकृत भाषा
३४४ अधिकृत भाषेसंबंधी आयोग
प्रादेशिक भाषा
३४५ अधिकृत भाषा किंवा राज्याची भाषा
३४६ दोन राज्यांमधील किंवा एक राज्य आणि केंद्रशास्त्रातील संप्रेषणाची अधिकृत भाषा
३४७ राज्यातील काही लोक बोलत असलेल्या भाषेविषयी विशेष तरतुदी
सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांतील भाषा
३४८ सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि कायदे, विधेयके इ. मध्ये वापरण्याची भाषा
३४९ भाषेसंबंधी कायदे करण्याची विशेष प्रणाली
विशेष आदेश
३५० तक्रार निवारण्यासाठी अर्जात वापरावयाची भाषा
३५० ए प्राथमिक स्तरावर मातृभाषेत शिक्षण देण्याची सोय
३५० बी भाषिक अल्पसंख्याकांसाठी विशेष अधिकारी
३५१ हिंदी भाषेच्या विकासासाठी आदेश
 • घटनेतील आठवे परिशिष्ट:
१. आसामी २. बंगाली ३. गुजराथी ४. हिंदी ५. कन्नड ६. काश्मिरी
७. कोकणी ८. मल्ल्याळम् ९. मणिपुरी १०. मराठी ११. नेपाळी १२. उडिया
१३. पंजाबी १४. संस्कृत १५. सिंधी १६. तमिळ १७. तेलगू १८. उर्दू
१९. बोडो २०. संथाली २१. मैथिली २२. डोंग्री
 • घटनादुरुस्ती :
घटनादुरुस्ती वर्ष भाषा
२१वी १९६७ सिंधी
७१ वी १९९२ कोकणी, मणिपुरी, नेपाळी
९२ वी २००३ बोडो, डोंग्री, मैथिली, संथाली
९६ वी २०११ ‘ओरिया’ जागी ‘उडिया’ शब्द

Contact Us

  Enquire Now