तमिळनाडू किनार्‍याला ‘निवार’ चक्रीवादळाचा तडाखा

तमिळनाडू किनार्‍याला ‘निवार’ चक्रीवादळाचा तडाखा

  • तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या किनारपट्टीवर नुकतेच ‘निवार’ हे उष्णकटिबंधीय चक्रीवादळ धडकले.
  • ‘निवार’ हे नाव इराणने सुचविले आहे, ज्याचा अर्थ प्रतिबंध असा होतो.
  • पश्चिम बंगाल आणि ओदिशा किनारपट्टीवर आदळणार्‍या ‘अम्फान’ नंतर बंगालच्या उपसागरातून आलेले ‘निवार’ हे दुसरे चक्रीवादळ.
  • निवार हे त्याच्या निर्मितीपासून पश्चिमेकडे आणि त्यानंतर वायव्येकडील कुडलोरच्या (तमिळनाडू) दिशेने १६ किमी/तास या वेगाने सरकले असून या चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या वार्‍यांचा वेग १२० किमी/तास होता.

चक्रीवादळ :

  • निर्मिती : एखाद्या ठिकाणी कमी दाब व भोवताली जास्त दाब अशी परिस्थिती निर्माण होते, तेथे उष्ण कटिबंधीय आवर्त निर्माण होतात.
  • दिशा : पृथ्वीच्या परिवलनामुळे आवर्त वारे उत्तर गोलार्धात घड्याळ्याच्या दिशेने तर दक्षिण गोलार्धात घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वाहतात.  
  • नावे : जागतिक हवामान संघटना (WMO) आणि संयुक्त राष्ट्राच्या Economic And Social Commission for Asia and the Pacific (ESCAP) यांच्यात २००० साली झालेल्या करारान्वये अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये तयार होणार्‍या उष्ण कटिबंधीय चक्रीवादळांना नावे बहाल केली जातात.
  • बांगलादेश, भारत, मालदीव,   थायलंड, म्यानमार, पाकिस्तान, श्रीलंका, ओमान,  इराण, कतार, सौदी अरेबिया, युएई आणि येमेन हे तेरा देश या वर्षासाठी १६९ चक्रीवादळांच्या नावांची यादी जागतिक हवामान संघटनेकडे सूपूर्द करतात.
  • चक्रीवादळांना पश्मिच अटलांटिक महासागर आणि ईशान्य पॅसिफिक महासागरात हरिकेन, पश्चिम पॅसिफिक महासागरात टायफून, दक्षिण पॅसिफिक महासागर, हिंदी महासागर, बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात उष्ण कटिबंधीय चक्रिवादळ (Tropical cyclone) तर ऑस्ट्रेलियात विलीविली या स्थानिक नावांनी ओळखले जाते.

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now