डॉ. एस. कामेश्वरम
- जन्म – १९२३
- मृत्यू – २६ जून २०२१
परिचय
- १ जुलै डॉक्टर्स डे साजरा करून वैद्यकीय व्यवसायाचे समाजाशी नाते व समाजाशी बांधिलकी याविषयी बोलले जाते, पण प्रत्यक्षात डॉ. एस. कामेश्वरम यांनी त्यांच्या वैद्यकीय तज्ज्ञतेचा लाभ समाजाला करून देताना सामाजिक बांधिलकी जपली होती.
- वयाच्या ९० व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
- कामेश्वरम देशातील एक प्रख्यात कान-नाक-घसातज्ज्ञ होते.
- ज्या मुलांना जन्मजात बहिरेपणा आहे, त्यांची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांना ऐकता येऊ लागले.
- मुख्यमंत्री आरोग्य निधीतून अनेक मुलांवर त्यांनी प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया केल्या.
- जन्मजात बहिरेपणा व इतर आजारामुळे माणसाच्या ज्ञानचक्षूंना मर्यादा येतात व सर्वांगीण प्रगती होत नाही.
- तमिळनाडूत बहिरेपणाचे प्रमाण जगात सर्वाधिक म्हणजे ०.६ टक्के आहे याचे कारण म्हणजे राज्यातील सांस्कृतिक परिपाठामुळे समरक्त विवाह केले जातात.
- त्यातून श्रवणदोष निर्माण होतात अशा लोकांसाठी त्यांनी पुनर्वसन केंद्रे चालवली.
- मद्रास वैद्यकीय महाविद्यालयाच्या कान-नाक-घसा यांच्या रोगावरील या विभागाचे प्रमुख होते.
- ते माजी राष्ट्रपती आर. व्यंकटरमण यांचे शल्यविशारद म्हणून, तसेच जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले होते.
पुरस्कार
- १९९० – पद्मश्री
- १९८१ – डॉ. बी. सी. रॉय पुरस्कार
- २००६ मध्ये कामेश्वरम यांचे पुत्र डॉ. मोहन कामेश्वरम यांनाही पद्मश्रीचा मान मिळाला आहे.