डॉ. एशी नेगिशी
जन्म – १४ जुलै, १९३५ चँगचून (चीन)
मृत्यू – ११ जून २०२१
अल्प परिचय
- २०१० मध्ये रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळवणारे वैज्ञानिक डॉ. एशी नेगिशी यांचे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.
- औषधाच्या निर्मितीसाठी रेणूची निर्मिती हे किचकट काम काहीसे सोपे करण्याचा प्रयत्न नेगिशी यांनी केले.
- कार्बन आधारित रेणू औषधे, प्लॅस्टिक, औद्योगिक घटक यात वापरतात. पण कार्बनच्या रेणूची इतर रेणूशी बंध जुळवून बंध तयार करणे कठीण
- पण नेगिशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी काही धातू व उत्प्रेरक म्हणून पॅलेडियमचा वापर करून संयुगाचे बंध निर्माण केले.
- पॅलेडियमच्या मदतीने दोन कार्बनी रेणू चिकटवण्याचे काम केले. १९७७ मध्ये नेगिशी यांनी कार्बनचे अणू एकमेकांत मिसळून जस्ताची संयुगे तयार केली.
- रसायनशास्त्रात १० कार्बनी रेणू वापरतात. पण आवर्त सारणीतील सगळ्याच मूलद्रव्यांचा वापर करावा असे त्यांना वाटत होते.
- डॉ. नेगिशी यांना २०१० मध्ये रिचर्ड हेक (डेलावेअर) व अकिरा सुझुकी (डोकायडो विद्यापीठ, सॅपोरे जपान) यांना नोबेल मिळाले होते.
- टोक्यो विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी घेतली. नंतर इवाकुनी लॅबोरेटरीत रसायनशास्त्रज्ञ म्हणून काम केले.
- डॉ. ब्राऊन हे परड्यूचे पहिले नोबेल विजेते तर नेगिशी दुसरे
- डॉ. नेगिशी २०१९ मध्ये निवृत्त झाले, तेव्हा त्यांच्या नावे ४०० शोधनिबंध होते.
- ते जपानचे नागरिक झाले व त्यांना २०१० मध्ये त्यांना सम्राट अकिहितो यांच्या हस्ते सांस्कृतिक सन्मानाने गौरविण्यात आले.