डांबरीकरणाची नोंद लिम्का बुकमध्ये होणार
- सोलापूरहून विजापूरकडे जाणाऱ्या एका २५ किमी रस्त्याचं काम अवघ्या १८ तासांत पूर्ण करण्याचा पराक्रम भारतातील एका कंपनीने केला आहे.
- या घटनेची नोंद आता ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्’ यामध्ये घेतली जाणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
- मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर ते विजापूर दरम्यान ११० किमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात येत आहे. हा रस्ता चौपदरी आहे. पण तरीही या मार्गावर २५.५४ किमी लांबीचा रस्ता केवळ १८ तासांत तयार करण्याचा विक्रम संबंधित ठेकेदार कंपनीने केला आहे.
- या विक्रमासाठी ५०० मजुरांनी महत्त्वाचं योगदान दिले आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांनी संबंधित ठेकेदार कंपनीचे आणि ५०० कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
- हा महामार्ग ऑक्टोबर २०२१ पर्यंत पूर्ण होणार आहे. सोलापूर ते विजापूर हा महामार्ग पूर्व महाराष्ट्र आणि कर्नाटक यांना जोडणारा एक महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग आहे.
- NH52 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या रस्त्यावर सोलापूर आणि विजापूर दरम्यान अनेक बायपास रस्ते काढले जाणार आहेत. तसेच या मार्गात सहा उड्डाणपूलही बांधण्यात येणार आहेत.