टोळधाड रोखण्यासाठी ड्रोनचा वापर
- भारतात शिरणार्या टोळ कीटकांचा नायनाट करण्यासाठी ड्रोनने फवारणी करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. कारण वाहनांद्वारे फवारणी केल्यास कीटकनाशक उंच झाडांपर्यंत पोहोचत नाही आणि कीटकनाशक फवारणीचा संपूर्ण फायदा होत नाही.
- एप्रिल महिन्यात पाकिस्तानातून आलेल्या टोळधाडीमुळे राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रातील विदर्भातील काही जिल्ह्यांचे नुकसान झाले होते. यावर्षी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने टोळधाड रोखण्यासाठीची तयारी सुरू केली आहे.
- BIFEN XTS हे कीटकनाशक टोळ कीटकांना मारण्यासाठी वापरले जाते. हे कीटकनाशक फवारण्यासाठी लागणारे स्प्रे भारताला इंग्लंडमधील मायक्रोन स्प्रेयरस ही कंपनी उपलब्ध करून देणार आहे.