टीआरपी यंत्रणेच्या फेरआढाव्यासाठी समिती

टीआरपी यंत्रणेच्या फेरआढाव्यासाठी समिती

 • मुंबईत उघडकीस आलेल्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर दूरचित्रवाणी गुणांक पद्धतीचा (TRP = Television Rating Point) फेरआढावा घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
 • केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी हेम्पती यांची चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे.
 • ही समिती दोन महिन्यांत मंत्रालयाला अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर टीआरपी संदर्भातील नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील.
 • टीआरपीची विद्यमान यंत्रणा २०१४ मध्ये प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे कार्यरत आहे. गेल्या सहा वर्षांत दूरचित्रवाणी क्षेत्रात झालेल्या बदलानुरूप रेटिंग अवस्थेतही सुधारणा करण्याची गरज आहे.
 • यापूर्वी दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) रेटिंगची व्यवस्था अधिक पारदर्शी करण्यासाठी शिफारसी केल्या आहेत.
 • शशी हेम्पती यांच्या नव्या समितीत आयआयटी कानपूरच्या गणित व सांख्यिकी विभागाचे प्राध्यापक डॉ. शलभ, सी-डॉटचे कार्यकारी संचालक डॉ. राजकुमार उपाध्याय, ‘सेंटर फॉर पब्लिक पॉलिसीतील निर्णय विज्ञानाचे (डिसिजन सायन्सचे) प्रा. पुलक घोष हे सदस्य असतील.
 • रेटिंग व्यवस्थेसंदर्भातील यापूर्वी केलेल्या शिफारसींचा अभ्यास करणे, प्रामुख्याने ट्रायच्या शिफारसींचा अभ्यास करणे, विद्यमान मार्गदर्शक सूचनांचे मूल्यमापन करणे, रेटिंग व संबंधित मुद्द्यांची माहिती घेऊन त्याचे विश्लेषण करणे हे समितीचे कार्यक्षेत्र असेल.

टी. आर. पी. विषयी

 • TRP – Television Rating Point दूरचित्रवाणी गुणांक पद्धती
 • टी.आर. पी. म्हणजे ठराविक लोकसंख्येच्या लोकांनी ठराविक वेळेला पाहिलेल्या कार्यक्रमांची टक्केवारी होय.
 • दोन-चार वर्षांपूर्वी टी.आर.पी.साठी डेटा मिळवण्याचे काम हे TAM Media Research या कंपनीकडे होते. पण नंतर Broadcast Audience Research Council (BARC) यांनी हे काम स्वत:च्या अखत्यारीत करून घेतले आणि आता BARC कडून कार्यक्रमांना दिल्या जाणाऱ्या रेटिंग अधिकृत मानल्या जातात.
 • या रेटिंगसाठी डेटा मिळवण्याचे काम केले जाते. रेटिंग मशीनच्या माध्यमातून याच मशीनला People’s meter असे म्हणतात. या मशीन्स कंपनीशी जोडल्या गेलेल्या ठराविक प्रेक्षकांच्या घरात बसवल्या जातात. या मशीन नजर ठेवतात की, प्रेक्षक कोणत्या वेळेला, कोणता कार्यक्रम, किती वेळा पाहतो. या मशीन्स संपूर्ण देशभरातील प्रेक्षकांच्या घरी त्याच्या संमतीनेच बसवल्या जातात. ३० दिवसानंतर त्या प्रेक्षकाने कोणते चॅनेल आणि कार्यक्रम किती वेळा पहिले याची अंदाजे आकडेवारी उपलब्ध होते.

टीआरपी मिळवण्यासाठी दोन प्रकारच्या पद्धती वापरल्या जातात.

 1. Frequency monitoring
 • या पद्धतीत वर सांगितल्याप्रमाणे प्रेक्षकांच्या घरी मशीन्स बसवल्या जातात. या मशीन्स प्रत्येक चॅनेलच्या फ्रीक्वेन्सी समजून घेतात आणि नंतर त्या ठराविक चॅनेलच्या नावामध्ये रेकॉर्ड केलेला डेटा डिकोड करतात. पण या पद्धतीत एक त्रुटी आहे. ती अशी की बऱ्याचदा केबल ऑपरेटर्स टीव्हीला सिग्नल पाठवण्यापूर्वी विविध चॅनेल्सच्या फ्रीक्वेन्सी वारंवार बदलतात त्यामुळे ठराविक फ्रीक्वेन्सीवरून ठराविक चॅनेलचा डेटा मशीन रेकॉर्ड करत असेल याची खात्री देता येत नाही.
 1. Picture matching technique
 • या पद्धतीमध्ये देखील प्रेक्षकांच्या घरी मशीन्स बसवल्या जातात पण त्या काहीशा वेगळ्या पद्धतीने काम करतात. या मशीन्स ठराविक टीव्हीवर पाहिल्या जाणाऱ्या चित्रीकरणाचा संक्षिप्त भाग वारंवार रेकॉर्ड करत असतात तसेच ठराविक चॅनेलचा डेटा देखील संक्षिप्त चित्र रूपात साठवला जातो. हा गोळा केलेला डेटा नंतर मेन डेटा बँकमधील डेटाशी जुळवून पहिला जातो आणि त्यानुसार चॅनेलचे नाव समोर येते आणि कोणते चॅनेल किती वेळा पाहिले त्याची आकडेवारी केली जाते. अशा प्रकारे महिन्याभराचा डेटा गोळा केल्यानंतर कोणते चॅनेल आणि कोणते कार्यक्रम किती वेळा पाहिले जातात आणि त्यांची प्रसिद्धी किती हे मिळालेल्या परिणामातून सादर केले जाते.

Contact Us

  Enquire Now