जो बायडेन यांचे भाषण लिहिणारे विजय रेड्डी यांचे सर्वत्र कौतुक

जो बायडेन यांचे भाषण लिहिणारे विजय रेड्डी यांचे सर्वत्र कौतुक

 

  • अमेरिकेच्या ४६व्या राष्ट्राध्यक्षपदी जोसेफ बायडेन यांनी शपथ घेतली. शपथविधीनंतर त्यांनी भाषण केले. जवळपास २० मिनिटांच्या या भाषणाने अमेरिकेतील लोकांसोबत संपूर्ण जगाचे मन जिंकले. विनय रेड्डी या भारतीय वंशाच्या व्यक्तीने बायडेन यांचे हे भाषण लिहिले आहे.
  • विनय रेड्डी यांनी संपूर्ण प्रचारात अध्यक्ष बायडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची भाषणे लिहिली आहेत. नम्र भाषा, विषयाचे गांभीर्य आणि प्रेरणादायी विचार यामुळे बायडेन यांचे कौतुक होत आहे आणि त्यास कारणीभूत आहेत रेड्डी.
  • आपल्या भाषणातून बायडेन यांनी एकतेचा संदेश दिला. जीभ घसरल्यामुळे नेहमी वादाच्या भोवर्‍यात अडकत गेलेल्या ट्रम्प यांच्यासारख्या चुका आपल्या हातून होऊ नयेत म्हणून बायडेन यांनी त्यांची भाषणे लिहून घेतली.
  • अमेरिकेत अध्यक्षीय भाषणाची परंपरा जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या काळापासून चालू आहे. ३० एप्रिल १७८९ रोजी वॉशिंग्टनचे अध्यक्ष झाले होते.
  • अमेरिकेतील सध्याच्या आव्हानाच्या काळात लोकशाही, ऐक्य आणि आशा यांचे महत्त्व यांचा समावेश असलेले भाषण लिहिल्याबद्दल विनय रेड्डी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विनय रेड्डी यांच्याविषयी थोडक्यात

  • विनय नारायण रेड्डी हे मूळचे तेलंगणाचे आहेत.
  • त्यांचे कुटुंब हैदराबाद, तेलंगणाच्या २०० किमी अंतरावर असलेल्या पोथिरडिदेपेरा गावात आहे.
  • अमेरिकेत जन्मलेल्या रेड्डी यांनी त्यांचे शिक्षण ‘ओहियो स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ लॉ’मध्ये पूर्ण केले.
  • अमेरिकेच्या अध्यक्षाचे भाषण लिहिणारे रेड्डी हे पहिले भारतीय-अमेरिकी नागरिक ठरले. बायडेन २०१३-१७ मध्ये उपाध्यक्ष असतानाही रेड्डी त्यांच्याशी जोडलेले होते.

Contact Us

    Enquire Now