जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पास केंद्र सरकारची तत्त्वत: मान्यता
- महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूरमध्ये सहा अणुभट्ट्या उभारण्यास केंद्राने तत्त्वत: मान्यता दिली आहे.
- प्रत्येकी १६५० मेगावॅट क्षमतेच्या सहा अणुभट्या फ्रान्सच्या अरेवा कंपनीच्या तांत्रिक सहकार्याने उभारल्या जाणार आहेत.
- एकूण ९९०० मेगावॅट क्षमतेसह जैतापूर हे देशातील सर्वात मोठे अणुऊर्जा निर्मितीचे केंद्र असेल.
देशातील अणुऊर्जेसंबंधी सद्यस्थिती:
१) देशात सध्या स्थापित अणुऊर्जा क्षमता ६७८० मेगावॅट असून २०२०-२१ मध्ये एकूण वीज निर्मितीमध्ये अणुऊर्जेचा वाटा सुमारे ३.१ टक्के इतकाच आहे.
२) देशातील अणुऊर्जा प्रकल्पातून वीज उत्पादन वाढवण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत, यात १० स्वदेशी ७०० मेगावॅटच्या प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिॲक्टर्सना प्रशासकीय मान्यता आणि आर्थिक मंजुरीचा समावेश आहे.
३) सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या संयुक्त उपक्रमांना अणुऊर्जा प्रकल्प उभारता यावे यासाठी सरकारने अणुऊर्जा कायद्यातही (१९६२) सुधारणा केली आहे.
४) प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर २०३१ पर्यंत ६७८० मेगावॅटची क्षमता २२४८० मेगावॅटपर्यंत वाढवणे अपेक्षित आहे.
अणुऊर्जा आणि पर्यावरण :
- अणुऊर्जा स्वच्छ आणि पर्यावरणास अनुकूल आहे.
- अणुऊर्जा प्रकल्पांनी आतापर्यंत सुमारे ७५५ अब्ज युनिट्स वीज निर्माण केली आहे. ज्यामुळे ६५० दशलक्ष टन कार्बन (CO2) उत्सर्जनाची बचत झाली आहे.
- अणुऊर्जेसह इतर स्वच्छ ऊर्जास्रोतांच्या संयोजनाद्वारे निव्वळ शून्य लक्ष्य (Net Zero Targets) गाठणे अपेक्षित आहे.
- १९५०च्या दशकात होमी भाभा यांनी तीन टप्प्यांत अणुऊर्जा कार्यक्रम तयार केला होता.
- भारतीय अणुभट्ट्यांमध्ये अणुइंधन म्हणून चांगली क्षमता असलेले युरेनियम आणि थोरियम या दोन नैसर्गिक घटकांचा वापर करण्याच्या उद्देशाने अणुऊर्जा कायदा, १९६२ अंमलात आणला गेला आहे.
- सध्या भारतात २२ कार्यरत अणुभट्ट्यांपैकी १८ अणुभट्ट्या प्रेशराईज्ड हेवी वॉटर रिॲक्टर्स; तर ४ लो वॉटर रिॲक्टर्सचा समावेश होतो.
- PWHR मध्ये कूलंट आणि नियंत्रक म्हणून जड पाणी (ड्युटेरियम)चा वापर केला जातो.
कार्यरत अणुऊर्जा प्रकल्प | नियोजित अणुऊर्जा प्रकल्प |
१) रावतभाटा (राजस्थान) | १) जैतापूर (महाराष्ट्र) |
२) तारापूर (महाराष्ट्र) | २) कोववाडा (आंध्रप्रदेश) |
३) कुडनकुलम (तमिळनाडू) | ३) मिठी विर्डी (गुजरात) |
४) काक्रापार (गुजरात) | ४) हरिपूर (पश्चिम बंगाल) |
५) कल्पक्कम (तमिळनाडू) | ५) गोरखपूर (हरियाणा) |
६) नरोरा (उत्तरप्रदेश) | ६) भीमपूर (मध्यप्रदेश) |
७) कैगा (कर्नाटक) | ७) माही बन्सवाडा (राजस्थान) |
८) चुरका (मध्यप्रदेश) |