जुन्या वाहनांसाठी धोरण जाहीर

जुन्या वाहनांसाठी धोरण जाहीर 

 • रस्त्यावर धावण्यासाठी योग्य असल्याचे वैधता प्रमाणपत्र मिळवण्यात फोल ठरलेल्या १५ वर्षे आणि त्यापेक्षा जुन्या खासगी व व्यावसायिक वाहनांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय 18 मार्च 2021 रोजी संसदेत घेण्यात आला. 
 • हे धोरण मध्यमवर्ग व गरिबांसाठी फायद्याचे असून प्रदूषण कमी करण्यास व अपघात रोखण्यास याची मदत होणार आहे. 
 • या धोरणाचा आराखडा केंद्रीय रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत मांडला. 

सरकारची भूमिका:

 • पेट्रोल-डिझेलच्या वाहनांना पर्यायी ठरणारी सीएनजी, जैवइंधन, इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला केंद्र सरकार प्रोत्साहन देत आहे. 
 • 51 लाख हलकी वाहने २० वर्षे जुनी तर 34 लाख हलकी वाहने १५ वर्षे जुनी आहेत. 
 • १७ लाख मध्यम व अवजड व्यावसायिक वाहने पंधरा वर्षे जुनी आहेत.
 • जुन्या वाहनांच्या वापरामुळे बारा पटीने जास्त प्रदूषण होते. 
 • मोटर वाहन कायद्याअंतर्गत नवे धोरण लागू केले जाईल. 
 • या धोरणानुसार रस्त्यावर अपात्र ठरलेल्या वाहनांची नोंदणी रद्द करून ती वाहनतोड केंद्रांकडे देता येतील. 
 • दोन वर्षात 100 वाहनतोड केंद्रे सुरू होणार असून त्यातून कच्च्या मालाची केंद्रे उभी राहतील. 
 • प्लास्टिक, तांबे, ॲल्युमिनियम, पोलाद, रबर आदी कच्च्या मालाचा फेरवापर नव्या वाहनांच्या निर्मितीत केला जाणार असल्याने नव्या वाहनांचा उत्पादन खर्चही कमी होणार आहे. 
 • जीएसटीमध्ये वाढ 
 • देशातील वाहननिर्मिती उद्योगाची उलाढाल ७.५ लाख कोटींची असून त्यात निर्यात उलाढाल 3.5 लाख कोटी रुपयांची आहे. 
 • नव्या धोरणामुळे वाहन खरेदीत वाढ होऊन या उद्योगाची उलाढाल १० लाख कोटींवर पोहोचेल. 
 • वाहन खरेदीतून वस्तू व सेवा करामध्येही (जीएसटी) वार्षिक ३०-४० हजार कोटींची वृद्धि होईल. 
 • नव्या धोरणामुळे वाहन उत्पादन क्षेत्रात दहा हजार कोटींची गुंतवणूक वाढेल व त्यातून 35000 नवे रोजगार निर्माण होतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

५ टक्क्यांची सवलत:

 • जुन्या वाहनांची नोंदणी रद्द करण्यासाठी वाहनमालकांना प्रोत्साहन दिले जाणार असून वाहनतोडीनंतर नव्या वाहनांच्या किमतीच्या ४-६ टक्के रक्कम परत मिळू शकेल. 
 • राज्य सरकारकडून रस्ते वाहतूक करात खासगी वाहनांसाठी २५ टक्के आणि व्यावसायिक वाहनांसाठी १५ टक्के सवलत मिळेल. 
 • वाहनतोडीचे प्रमाणपत्र असेल तर नव्या वाहन खरेदीत ५ टक्क्यांची सवलत दिली जाईल. शिवाय नव्या वाहनांसाठी नोंदणी शुल्कही आकारले जाणार नाही. 

नवे धोरण काय?

 • वैधता प्रमाणपत्र नसलेली १५ वर्षे व त्याहून अधिक जुन्या व्यावसायिक वाहनांची नोंदणी रद्द केली जाईल येईल. 
 • हाच नियम 20 वर्षे जुन्या खासगी वाहनांसाठी लागू असेल. 
 • विंटेज कारसाठी हे धोरण लागू नाही. 
 • राज्य सरकार, खासगी कंपन्या व वाहन उत्पादन कंपन्या एकत्रितपणे पीपीपी वैधता प्रमाणपत्र केंद्रे सुरू करतील. 
 • या केंद्रांमध्ये वाहनतळासह सर्व अत्याधुनिक सुविधा पुरवल्या जातील 
 • वाहनांची योग्यता चाचणी या केंद्रावर तपासली जाईल. 
 • केंद्र व राज्य सरकारे, महापालिका, पंचायत समिती,  राज्य परिवहन उपक्रम, सार्वजनिक उद्योग कंपन्या, स्वायत्त संस्थांच्या मालकीच्या १५ वर्षे जुन्या वाहनांची नोंदणी रद्द करून तोडणी केली जाईल. 
 • वैधता चाचणी केंद्र व वाहनतोड केंद्रांसाठी १ ऑक्टोबर २०२१ पर्यंत नियम बनवले जातील. 
 • सरकारी व सार्वजनिक उपक्रमातील १५ वर्षे जुनी वाहने वाहनतोड केंद्रांमध्ये देण्याची अट १ एप्रिल २०२२ पासून लागू होईल. 
 • अवजड वाहनांसाठी वैधता प्रमाणपत्राची १ एप्रिल २०२३ पासून तर अन्य वाहनांसाठी १ जून २०२४ पासून सक्ती केली जाईल
 • भारत स्टेज इमिशन स्टॅन्डर्ड(BSES) 
 • बीएसईएस हे भारत सरकारद्वारे तयार केलेले उत्सर्जन मानक असून त्यात मोटार वाहनांसह कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन आणि स्पार्क इग्निशन इंजिन उपकरणातून वायू प्रदूषकांचे उत्पादन नियमित केले जाते.
 • केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत मानके व अंमलबजावणीची वेळ निश्चित केली जाते.
 • कार आणि दुचाकी वाहनांद्वारे होणाऱ्या प्रदूषणाचे नियमन करण्यासाठी भारत सरकारने भारत स्टेज इमिशन स्टॅंडर्ड म्हणून ओळखले जाणारे नियम तयार केले आहेत. 
 • ऑक्टोबर 2010 पासून भारतात स्टेज-3 (BS-III)चे नियम देशभर लागू केले. 
 • भारतातील प्रमुख १३ शहरांमध्ये स्टेज-IV नियम एप्रिल 2010 पासूनच लागू झाला, तर स्टेज-IV नियम संपूर्ण भारतात एप्रिल 2017 पासून लागू झाला. 
 • 2016 मध्ये भारत सरकारने जाहीर केले की BS-V नियम पूर्णपणे वगळला जाईल आणि 2020 पर्यंत BS-VI  हा सहावा मानदंड स्वीकारला जाईल. त्यानुसार २०२० पासून भारतात BS-VI नियम लागू आहे. 

वाहनातून बाहेर पडणारी प्रदूषके व त्याचा मानवी आरोग्यावर परिणाम:

 • कार आणि दुचाकी वाहनातून उत्सर्जित होणारी नायट्रोजन ऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड ही प्रदूषके मानवी आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहेत. 
 • वायू प्रदूषकांच्या प्रदर्शनामुळे श्वसनाचे, हृदयासंबंधीचे तसेच रक्तवाहिन्यासंबंधीचे रोग होण्याची शक्यता अधिक प्रमाणात आहे. 

Contact Us

  Enquire Now