जीआय टॅगसाठी नंदुरबारमधील मिरची, आमचूर तर नागपूरमधील साडीचा समावेश

जीआय टॅगसाठी नंदुरबारमधील मिरची, आमचूर तर नागपूरमधील साडीचा समावेश

 • भौगोलिक चिन्हांकनासाठी (जीआय टॅग) यंदा महाराष्ट्र राज्यातून नऊ अर्ज गेले असून त्यामध्ये शेतीमालाचे सहा, टेक्स्टाईलचे दोन तसेच दिव्यांगनिर्मित वस्तूचा एक अर्ज आहे.
 • यामध्ये नंदुरबारमधली मिरची आणि आमचूर,अलिबागमधून पांढरा कांदा, वाडामधून कोलम तांदूळ, भंडारामधून चिन्नूर तांदूळ, नागपूरमधून साडी तर उस्मानाबादी बकरी यांचा समावेश आहे.
 • तसेच दिव्यांगनिर्मित वस्तूंमध्ये सितारचा समावेश आहे.
 • एखाद्या विशिष्ट उत्पदनाबाबत एखाद्या क्षेत्राला, व्यक्तींच्या गटाला किंवा संघटनेला जीआय टॅगिंग दिले जाते. एखादे उत्पादन एखाद्या भागातच उत्पादित होत असेल तर त्याला जीआय टॅग दिला जातो.
 • एखाद्या उत्पादनाला किंवा पदार्थाला जीआय टॅग मिळाल्यास दुसरे कोणीच त्याची नक्कल करू शकत नाही.
 • भौगोलिक संकेतक (नोंदणी आणि संरक्षण) कायदा १९९९ अन्वये जीआय टॅग दिला जातो.
 • पहिले भौगोलिक निर्देशन “दार्जिलिंग चहा’ला मिळाले.
 • मिळालेला जीआय टॅग हा दहा वर्षांसाठी वैध असून दहा वर्षानंतर त्याचे नूतनीकरण करावे लागते.
 • महाराष्ट्रात एकूण ३१ वस्तूंना किंवा उत्पादनांना जीआय टॅग मिळालेला आहे.
 • सोलापुरी चादर, सोलापुरी टॉवेल, उपडा जमदानी साडी, पुणेरी पगडी, पैठणी साडी, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, नाशिकची द्राक्षे, वारली पेंटिंग, कोल्हापुरी गूळ, आजरा घनसाळ तांदूळ, वायगाव हळद, मंगळवेढा ज्वारी, भीवापूर मिरची, सिंधुदुर्ग व रत्नागिरी कोकम, वाघ्या घेवडा, नवापूर तूरडाळ, आंबेमोहर तांदूळ, वेंर्गुला काजू, सांगली मनुका, लासलगाव कांदा, डहाणू घोळवड चिक्कू, बीडचे सिताफळ, जालन्याचे गोड संत्री, जळगावची केळी, मराठवाड्याचे केसर आंबे, पुरंदरचे अंजीर, जळगावचे वांग्याचे भरीत, सोलापूरचे डाळिंब, नागपूरची संत्री, करवतकाठी साडी आणि कोकणचा हापूस आंबा.

Contact Us

  Enquire Now