जागतिक स्पर्धात्मकता अहवाल, २०२०
- स्वित्झर्लंडस्थित व्यवस्थापन व विकास संस्था (IMD), जागतिक स्पर्धात्मकता केंद्र (वर्ल्ड कॉम्पिटिटिव्हनेस सेंटर) यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात येणार्या जागतिक स्पर्धात्मक अहवाल,२०२० मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ४३व्या क्रमांकावर आहे.
- सिंगापूर, डेन्मार्क आणि स्वित्झर्लंड हे देश अनुक्रमे पहिल्या तीन अर्थव्यवस्था आहेत.
- हा अहवाल २३५ निर्देशकं समोर ठेवून एकूण ६३ राष्ट्रीय अर्थव्यवस्थांचे मूल्यांकन करतो. २०१९ या अहवालाचे ३०वे वर्षं होते.
- दीर्घकालीन रोजगार, परकीय चलनाच्या ठेवी, शिक्षणावरील खर्च, राजकीय स्थैर्य आणि एकंदरीत उत्पादनक्षमता या क्षेत्रांत भारताने उत्तम कामगिरी केली आहे. तर वास्तविक राष्ट्रीय स्थूल उत्पन्न, स्पर्धात्मकता वाढविणारे कायदे, कर आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांत भारताची कामगिरी चांगली नसल्याचे आयएमडीने म्हटले आहे.