जागतिक व्यापार संघटना (World Trade Organisation – WTO)

जागतिक व्यापार संघटना (World Trade Organisation – WTO)

 • एप्रिल १९९४ मध्ये गॅटच्या सदस्य राष्ट्रांनी मोरोक्कोमधील मर्राकेश या ठिकाणी एक करार संमत केला.
 • या मर्राकेश कराराद्वारे गॅटच्या जागी एक नवी संघटना, जागतिक व्यापार संघटना (WTO) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 • त्यानुसार १ जानेवारी १९९५ रोजी WTO ची स्थापना करण्यात आली.
 • गॅट ही १९४८ पासून जागतिक व्यापाराचे नियमन करणारी तात्पुरत्या स्वरूपाची अनौपचारिक संघटना होती.
 • WTO ला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त पण युनोची संख्या नाही.
 • मुख्यालय – जिनिव्हा

WTO ची वैशिष्ट्ये

 • सदस्य राष्ट्रातील नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणे.
 • रोजगारात वाढ घडवून आणणे.
 • वस्तूंचे उत्पादन आणि व्यापार वाढविण्यासाठी प्रयत्न करणे.
 • जागतिक संसाधनाच्या पर्याप्त वापर होईल असे पाहणे.
 • शाश्वत विकासाच्या संकल्पनेचा स्वीकार
 • पर्यावरण संवर्धन

Contact Us

  Enquire Now