जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक 2021 (World Press Freedom Index 2021)
जाहीर करणारी संस्था
- रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स (आंतरराष्ट्रीय अशासकीय संस्था)
मुख्यालय – पॅरिस (फ्रान्स)
सुरुवात – 2002
क्रमवारीतील एकूण देश- 180
हेतू
- प्रत्येक देशामध्ये पत्रकार, वृत्तसंस्था आणि नेटिझन्सला किती स्वातंत्र्य आहे आणि स्वातंत्र्याचा आदर करण्यासाठी अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांना प्रतिबिंबित करणे.
महत्त्वाचे मुद्दे
- हा निर्देशांक पत्रकारांना उपलब्ध असलेल्या स्वातंत्र्याच्या पातळीनुसार प्रकाशित केला जातो; यात पत्रकारितेच्या गुणवत्तेचा समावेश होत नाही.
- जगातील तज्ज्ञांनी पूर्ण केलेली 20 भाषांतील प्रश्नावली संकलित करून मूल्यमापनच्या काळात हे गुणात्मक विश्लेषण पत्रकारांवरील हिंसाचार व अत्याचाराच्या परिमाणात्मक माहितीसह एकत्रित केले जाते.
ही प्रश्नावली पुढील 6 मापदंडांवर आधारलेली असते.
- बहुलतावाद (Plurarism)
- माध्यमांचे स्वातंत्र्य (Freedom of Media)
- पर्यावरण आणि सेल्फ सेन्सॉरशिप
- विधायी चौकट (Legislative Framework)
- पारदर्शकता (Transparency)
- बातमी आणि माहितीच्या निर्मितीस समर्थन देणारी पायाभूत सुविधा (Infrastructure)
- या अहवालात पत्रकारितेसाठी अत्यंत वाईट परिस्थिती असलेले देश काळ्या रंगाने, वाईट परिस्थिती असलेले लाल तर समस्याप्रधान स्थिती असलेले देश नारंगी रंगाने दर्शविले जातात.
जागतिक परिस्थिती
- एकूण 180 देशांपैकी 73% देशांत पत्रकारितेस पूर्णतः किंवा अंशतः बंद करण्यात आले आहे.
- जगातील 132 देशांत पत्रकारितेसाठी अत्यंत वाईट परिस्थिती आहे.
- फक्त 12 देशांत म्हणजेच 7% देशांत पत्रकारितेस अनुकूल वातावरण आहे.
- या अहवालात आशिया-पॅसिफिक क्षेत्राबद्दल चिंता व्यक्त केली गेली आहे. कारण अनेक देशांनी पत्रकारिता स्वातंत्र्यावर अंकुश ठेवण्यासाठी देशद्रोह, राज्यांची रहस्ये आणि राष्ट्रीय सुरक्षा याविषयी कठोर नियम ठेवले आहेत.
अहवालानुसार,
अ. पहिले पाच देश
- नॉर्वे (गेल्या 5 वर्षांपासून प्रथम क्रमांकावर)
- फिनलँड
- स्वीडन
- डेन्मार्क
- कोस्टा रिका
ब. शेवटचे पाच देश
- इरिट्रिया (180)
- उत्तर कोरिया (179)
- तुर्कमेनिस्तान (178)
- चीन (177)
- जिबुती (176)
भारताची स्थिती
- या निर्देशांकानुसार प्रसारमाध्यम स्वातंत्र्यामध्ये जगातील 180 देशांमध्ये भारत 2020 प्रमाणेच 142व्या स्थानावर आहे.
- 2016 मध्ये 133व्या क्रमांकावर होता मात्र त्यानंतर या निर्देशांकात भारताची घसरण होत आहे.
- भारताचा समावेशदेखील ब्राझिल, मेक्सिको, रशियाप्रमाणेच पत्रकारितेसाठीच्या वाईट या वर्गीकरणात आहे.
- या अहवालानुसार, पत्रकारांना योग्य रीतीने त्यांचे काम करण्यासाठी सगळ्यात धोकादायक देशात भारताचा समावेश.
भारताच्या वाईट कामगिरीमागील कारणे
- पत्रकारांविरोधात पोलिसांचा हिंसाचार, राजकीय कार्यकर्त्यांकडून होणारे हल्ले आणि गुन्हेगारी गट किंवा भ्रष्ट स्थानिक अधिकाऱ्यांचा पत्रकारांनी केलेला खुलासा.
प्रेस स्वातंत्र्य
- कलम 19 – भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य
- कलम 19 (1) (अ) – प्रत्येक नागरिकाला आपला दृष्टिकोन, मत, विश्वास आणि दृढ विश्वास तोंडी, लेखी, मुद्रित, चित्राद्वारे किंवा इतर कोणत्याही प्रकारे मुक्तपणे मांडता येतो. या कलमांतर्गत वृत्तपत्र स्वातंत्र्याचा समावेश होतो.
- कलम 19 (2) – भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर पुढील बंधने येतात.
अ. देशाचे सार्वभौमत्व व अखंडता
ब. राष्ट्राचे संरक्षण
क. परदेशांशी मैत्रीपूर्ण संबंध
ड. सार्वजनिक सुव्यवस्था
इ. सभ्यता व नैतिकता
फ. न्यायालयाचा अवमान
ग. बदनामी
ह. हिंसेस चालना मिळणे
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना परिषदेपुढे बोलताना या स्वातंत्र्याचा अंतर्भाव अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये असल्याचे स्पष्ट केले होते.
सर्वोच्च न्यायालयाचे प्रेस संदर्भातील निवाडे
- अ) रोमेश थापर वि. मद्रास राज्य (1950) – सर्व लोकशाही संस्था, संघटनांकरिता प्रेसचे स्वातंत्र्य.
- ब) इंडियन एक्स्प्रेस वि. भारतीय संघ (1985) – वृत्तपत्रांचे (प्रेस) स्वातंत्र्य अबाधित राखणे आणि या स्वातंत्र्यामध्ये अडथळा ठरणाऱ्या सर्व कायद्यांना आणि प्रशासकीय कृतीला अवैध मानावे हे न्यायालयाचे कर्तव्य.