जागतिक वसुंधरा दिन

जागतिक वसुंधरा दिन

  • वसुंधरा दिन (Earth day) हा पर्यावरणविषयक कार्यक्रमांना पाठबळ देण्याचा एक पाया आहे. दरवर्षी २२ एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा दिन साजरा केला जातो.
  • या दिवसातून समाज विकास आणि पर्यावरण विकास कार्यक्रमांद्वारे काम करणार्‍या हजारो कार्यकर्त्यांशी समन्वय साधला जातो. यावर्षी ५० वा वसुंधरा दिन साजरा झाला.
  • सर्वप्रथम १९७० साली हा दिवस साजरा करण्यात आला.
  • सन १९६२ मध्ये सागरी जीवशास्त्रज्ञ राचेल कार्सन यांनी लिहिलेले ‘सायलेंट स्प्रिंग’ न्यूयॉर्क टाइम्सने प्रकाशित केले. या पुस्तकाच्या माध्यमातून कार्सन यांनी सजीवसृष्टी, पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्य यासंदर्भात केलेली जनजागृती खूप आधिक होती. या वाढत्या जनजागृतीतूनच १९७० मध्ये ‘वसुंधरा दिन’ साजरा करण्याची कल्पना पुढे आली. ही कल्पना सर्वप्रथम अमेरिकन खासदार गेलॉर्ड नेल्सन यांनी मांडली.
  • १९९० मध्ये हा दिवस जागतिक स्तरावर साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. १९९२ मध्ये ‘रिओ दी जानेरो’ येथे संयुक्त राष्ट्रसंघाकडून ‘वसुंधरा शिखर परिषदेचे’ आयोजन करण्यात आले.
  • कार्बन उत्सर्जनात कपात करणे आणि त्यासाठी शाश्वत स्वरूपाचे पाठबळ मिळवून देणे या उद्देशाने २०१० मध्ये ४० व्या वसुंधरा दिनानिमित्त’ ए बिलियन अ‍ॅक्ट्स् ऑफ ग्रीन’ या मोहिमेची सुरुवात झाली.
  • १९७० मध्ये पहिल्या वसुंधरा दिनी ‘अर्थ डे नेटवर्क’ (EDN) ची स्थापना करण्यात आली.
  • २०२१ सालची या दिनाची थीम ‘Restore our Earth’ अशी आहे.

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now